सफल विकास वेलफेअर सोसायटीला राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार प्रदान..!!

Share

प्रतिनिधी :प्रकाश जैस्वार

मुंबई, सफल विकास वेलफेअर सोसायटी या सामाजिक संस्थेला ला ऑल जर्नलिस्ट्स अँड फ्रेंड्स सर्कल या पत्रकार मित्र संघटनेच्या वतीने सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय विशेष प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आलं कोल्हापुरात हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय विषयाचे जानकार वरिष्ठ विश्लेषक व पत्रकार जतीन देसाई व वरिष्ठ पत्रकार सचिन परब, माहिती उपसंचालक डॉ.संभाजी खराट यांच्या हस्ते व इतर मान्यवर व पत्रकार यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निसार अली सय्यद यांनी पुरस्कार स्वीकारले.
सफल विकास वेलफेअर सोसायटी च्या वतीने कोविड काळात दोन रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले होते तसेच सॅनिटायझेशन,धान्य वाटप, शिजवलेले अन्नाचे वाटप. मास्क,हॅण्ड सॅनिटायझर वाटप, अपनी सुरक्षा अपने हाथ महामारी पर करेंगे मात ही मोहीम राबवत कोरोना संशयित रुग्ण शोध मोहीम राबवली होती.सांस्थेच्या कार्याची दखल घेत ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल च्या वतीने संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र प्रत्येक पुरस्कार हा विशेष असतो तसेच महत्व ही वेगळे असते मात्र यातून अधिक समाजा साठी कार्यकरण्याची प्रेरणा आणि ऊर्जा प्राप्त होते तसेच AJFC संस्थापक अध्यक्ष यासिन पटेल, राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कोळी, महाराष्ट्र अध्यक्षा कांचन जांबोटी,सचिव बाळकृष्ण कासार यांचे आभार –सचिव वैशाली महाडिक.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *