प्रतिनिधी :वैशाली महाडिक

मुंबई,13व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त खारोडीतील सेंट ज्यूडस शाळेतील चिमुकल्यांनी घेतली मतदारा चा हक्क बजावण्याची प्रतिज्ञा. दिनांक 25जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने शासन पातळीवर तसेच इतर खासगी संस्था, संघटना, तसेच शाळा मतदारांना मतदानचे महत्व समजावून सांगतात तसेच या वेळी नव मतदार आणि जुने मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित करून जण सामान्य मतदारांत जनजागृती केली जाते या निमित्ताने सेंट ज्यूडस शाळेच्या विध्यार्थिनी हेमा झा हिने विध्यार्थी, विध्यार्थिनी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच प्राचार्य स्टॅनली डिलिमा, प्राधानाध्यापिका लता सावंदाणे,शिक्षक मीना डिसोझा, श्वेता ठाकरे, अॅलेक्स बोर्डे, सोनल नार्वेकर, चंदा सुरज,सचिन कुमार पांडे, सोनल डिसिल्वा, ऍडरीना ऐथेलिया, असगर अली, सचिन राणे, अश्विथा राव, वृक्षामाली, सलोनी खैरे,तसेच इतर लोकांच्या उपस्थितीत सामूहिक प्रतिज्ञा पठण केली.

तसेच शाळेतील विध्यार्थ्यांनी परीक्षा पे चर्चा पर्व 6अंतर्गत आयोजित चित्रकला स्पर्धेत उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी होत आनंद लुटले.
