प्रतिनिधी :मिलन शाह
केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून मागील ८ वर्षांत यांनी काहीही विधायक कार्य केले नसून काँग्रेस सरकारने ७० वर्षात उभी केलेली देशाची संपत्ती विकण्याचा सपाटा लावला आहे. देश विकणाऱ्या भाजपाची वक्रदृष्टी आता मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवींवर पडली असून ११ हजार कोटी रुपयांची मुदत ठेव मोडण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. हा पैसा मुंबईकरांचा असून त्यावर डल्ला मारण्याचा भाजपाचा डाव आहे, असा आरोप काँग्रेस नेते व प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केला आहे.
भाजपा सरकारने देशातील विमानतळ, बँका, विमा कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग एक-एक करून विकण्याचा सपाटाच लावला आहे. देश विकून देश चालवला जात आहे, आता त्यांची नजर मुंबई महानगरपालिकेत असलेल्या ८८ हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवीवर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील महिन्यात मुंबई दौऱ्यावरील भाषणात त्यांनी ‘पैसा बँकेत पडून’ असल्यावर भाष्य केले होते तेंव्हाच ह्या मुदत ठेवी भाजपा सरकार मोडीत काढणार अशा शंका उपस्थित झाली होती व तसेच झाले. यंदाच्या मुंबई महानगर पालिकेच्या अर्थसंकल्पात ११ हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवू मोडीत काढण्याची तरदूत करण्यात आली. ही मोठी मुदत ठेव ही काही दोन पाच महिन्यात जमा झालेली नाही, त्यासाठी अनेक वर्ष लागली आहेत.
मुंबईकरांच्या कष्टाचा हा पैसा संपवू दिला जाणार नाही या मुदत ठेवी सुरक्षित राहतील याकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच सुचित केल्यामुळे भाजपाचे राज्यातील नेतृत्व त्याची अंमलबजावणी करण्यास पुढे सरसावले आहे. ८८ हजार कोटी रुपयांच्या मुदतठेवी संपवूनच भाजपा थांबले असे दिसते,असेही राजहंस म्हणाले.
Ohh