
प्रतिनिधी :सुरेश बोरले
मुंबई,क्रिकेट च्या दुनियेचा सिक्सर मन हरपला.भारतीय क्रिकेट चे एकेकाळ चे स्टार क्रिकेटर सलीम दुराणी यांचे
आपल्या राहत्या घरी जामनगर येथे घरात पडून अस्थिभंग होऊन, त्यांच्या पायाला मोठी जखम झाली.परंतु उपचारा दरम्यान शुक्रवारी दिनांक 1 एप्रिल रोजी, ,त्यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले.
1960 ते 1970 च्या दशकातील, अतिशय जबरदस्त असा हा क्रिकेटर,सिक्सरमन म्हणून अतिश प्रसिद्ध.प्रेक्षकांच्या मागणी नुसार षटकार लागणार हा मदमस्त्त खेळाडू.अफगाणिस्तानात जन्मलेले सलीम दुराणी मग भारतात स्थायिक झाले.पहिले अर्जुन अवार्ड क्रिकेटर सन्मानित खेळाडू.अफगाणी पठाण असल्याने दिसायला सुंदर होते.त्यांनी दोन हिंदी चित्रपटात कामेही केलेली आहेत.असे हे जबरदस्त खेळाडू ,कुणीही कधीही समारभास प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण केल्यास,त्वरित हजर राहणारे. त्यांनी चरित्र आणि एक मासूम ह्या चित्रपटात म्हणून कामे केली. त्यांच्या मृत्यू च्या बातमीने क्रिकेट रसिका मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.