
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
आज महालक्ष्मी होमिओपॅथी मेडिकल कॉलेज येथे विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मान्य घेऊन प्राचार्यांना निवेदन देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी आले होते. परंतु महाविद्यालयाच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारले नाही. म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व स्थानिक विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. महाविद्यालयाची फी नाही भरली म्हणून 4 दिवस विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढण्यात आले. व हजेरी 75 टक्के भरली नाही म्हणून अडवणूक केली जात आहे. हॉस्टेल ला आपल्या मनाप्रमाणे नियम बनविण्यात आले आहे. रात्री ०८ वाजता सर्व विद्यार्थांचे मोबाईल जमा करून घेतले जातात. कॉलेज च्या काही प्राध्याकांकडून विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या वयक्तिक आयुष्यावर वेगवेगळे आरोप केले जातात. महाविद्यालयात पालकांना परवानगी दिली जात नाही. विद्यार्थ्यांना रजा हवी असेल तर कॉलेज प्रशासनाला एक आठवडा आदी अर्ज करावा लागतो. अश्या अनेक मागण्या घेऊन विद्यार्थी आंदोलन करत आहे. यावेळी अभाविप चे प्रदेश सह मंत्री अमोघ कुलकर्णी, शहर मंत्री कृपा गोळे, श्रीनाथ साळुंके, पृथा टोणपे, ओम दळवी हे आंदोलन चालवत आहेत.
