गणेशपुरीतील अन्नपूर्णा प्रसादालयात सेवेकरांची व इतर वस्तूंचा वानवा!

Share


प्रतिनिधी :सुरेश बोरले

हे दोन शब्द लिहिण्यापूर्वी हे शब्द कोणाला हिनावयाला किंवा त्यांच्यावर कोणतीही टीका करण्यास नाही हे सर्वस्वही लोकांनी जाणून घ्यावे. जवळजवळ वीस वर्षांपूर्वीहुंन अधिक काळी मी स्वतः गणेशपुरी येथे माझ्या लहान मुलां बरोबर आलो असता, आनंदाने मी येथे दोन दिवस राहिलो होतो. त्यावेळेला गणेशपुरीच्या देवळाच्या शेजारी डाव्या बाजूला एक छोटस कौलारू अन्नछत्र होतं. पाच रुपये प्रमाणे प्रत्येकी थाळी मिळत असे. त्यामुळे मी कधी आलो की, त्यावेळेला मी त्या प्रसादाचा लाभ नक्की घेत असे.कारण पाच रुपयात अतिशय गोड आणि चविष्ट असे जेवण मिळत असे. दोन भाज्या,डाळ, तीन पोळ्या दही पापड लोणचं आणि खीर असा प्रसादाचा सरंजाम असायचा. समजा प्रसाद म्हणून देवाचा घेऊन, पोट भरत असे. परंतु बऱ्याच वर्षांनी मध्ये येऊ शकलो नाही आणि जवळ जवळ दहा वर्षांनी त्यानंतर मी गणेशपुरीला आलो असता,ते अननालय बंद होते.तेथे मोठी इमारत बनली आहे. देवळाच्या समोरच्या रस्त्याला, शेजारी “अन्नपूर्णा”ह्या नावाने ट्रस्ट आहे.नित्यानंद प्रतिभा इंजीनियरिंग अँड डोनेटेड बाय प्रतिभा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज लिमिटेड मुंबई २/७/२०१२. असे लिहिलेले दिसते.पण बऱ्याच वर्षांनी मी या ठिकाणी आलो असताना जेवणाची चव तिथे उत्कृष्ट,सकाळचा नाश्ता तर लाजवाब असायचा. लोक हमखास या ठिकाणी वज्रेश्वरी किंवा गणेशपुरीला आले की या प्रसादाचा लाभ घेत असत, अजूनही आहेत.परंतु मी आज या ठिकाणी बऱ्याच दिवसांनी आलेलो आहे, तीन दिवस राहतोय आणि या प्रसादलयाचा लाभ घेताना वाईट वाटतं आहे, नाश्त्याचे ते वडे किंवा मेंदू वडा किंवा इडली आणि सांबर चटणी ह्या पदार्थाला बिलकुल स्वाद नाही. शिवाय त्यांची आकाराची जी पद्धत होती अतिशय कमी झालेली आहे.पूर्वी येत असताना वडा अक्षरशा ताटा मध्ये भरलेले असायचा. इडली अक्षर भरलेली असायची. कदाचित महागाईमुळे अशी परिस्थिती आली असावी, असे लोकांना वाटते. या ठिकाणी खाताना थाळी मध्ये दही असायचे, पापड असायचा आणि सेवेकरी एका मोठ्या एका चार प्रकारच्या पात्रात, खाण्यासाठी भाजी व डाळ घेऊन, फुकटचे देत फिरत असायचे. प्रत्येक टेबलावर पाण्याची व्यवस्था करायचे. आता तर सेवेकर्‍यांचा थांग पत्ताच नाही. या ठिकाणी खरकट भरलेल्या थाळ्या पडलेल्या असतात. तर सेवेकरी,एक ठिकाणी बसून पंख्याच्या खाली टेबलावर गप्पा मारत असतात. कधी स्वतः भक्त जेवलेली थाळी आणून एका ठिकाणी ट्रे मध्ये ठेवतोय याची वाट पाहत असतात. प्रत्येक टेबलावर पाण्याचे व्यवस्था नाही. जगा मध्ये पाणीच नसते. सेवेकरी पण फिरकत नाहीत. प्रत्येक पदार्थाला आता दहा रुपये लावता किंवा 20 रुपये लावता.मग हे कितपत योग्य आहे? हे येथील व्यवस्थापनाला कळते की नाही, अतिशय वाईट वाटत आहे. चव व पदार्थाचा आकार तसेच सेवकांची सेवा ही बदललेली आहे. नाहीतर व्यवस्थापनाचा ह्या सगळ्या गोष्टीवरती व्यवस्थित ताबा नाही, असे लोकांना वाटते. आपण पूर्वी सगळ्या गोष्टी लागणाऱ्या फुकट देत होतात, आकारही चांगला होता, चवही चांगली होते सेवा ही चांगली होती! आता तर,अधिक भार लावता मग वरील आधीच्या गोष्टी,आपण भक्तांना का देऊ शकत नाही ? सेवेकरी बिलकुल सेवा देत नाहीत. त्यांना ताट खरकटी उचलायचा त्रास, पाणी आणून देण्याची इच्छा नाही, पाण्याचा जग भरून ठेवायची इच्छा नाही. शेवटी स्वतः जेवलेले भक्त माणसं स्वतः ताटे उचलून ट्रे मध्ये ठेवतात, हे मुद्दाम पाहात बसायचे? भक्ताने ताटे जेवल्यावर उचलली नाही, मग आळशा सारखे उठायचे जीवावर आल्यासारखे काम करायचे.अशी परिस्थिती दिसते.एकावेळी सगळ्या टेबलावर , पूर्वी सेवाकरांची चांगली रेलचेल असायची. भक्त जेवल्यावर तृप्त मनाने तेथून बाहेर पडायचा. पण आताची परिस्थिती पाहून अतिशय वाईट वाटतंय,शेवटी हे प्रसादालय भक्तांच्या प्रसादासाठी ठेवायचे की नाही? तेथील दानशूर लोकांच्या हातामध्ये आहे. कदाचित त्यांना तेथे वैयक्तिक लक्ष देता येत नसावे, असे भक्त मंडळींना वाटते.परंतु आज या ठिकाणी बरीचशी वानवा आहे. सेविकरांना सेवे द्यायचे नाही, फक्त वेतन घ्यायचे आहे. असा भक्त मंडळींचा समज झाला आहे. दानशूरांनी मनापासून या ठिकाणी व्यवस्थित लक्ष घालून जर ही सेवा आपल्या हातात व्यवस्थित घेतली, तर छत्रात
येणारा भक्त अतिशय तृप्त मनाने बाहेर पडेल. कारण थाळी सोबत त्याला पापड, दही, लोणचं,खीर याचा आनंद त्याला घेता येईल. आता तर आपण प्रत्येक पदार्थाला अधिक शुल्क लावता, त्यात हे शक्य आहे.असं लोकांना वाटते. हे तरी कमीत कमी येथील दानशूरांनी जाणून घ्यावे. सगळ्या गोष्टी पूर्वी प्रमाणे होण्यासाठी, कृपया आपण स्वतः जातीने लक्ष घालावे! येणाऱ्या भक्तांना चांगली सेवा अन्नदानाची मिळावी हीच अपेक्षा आहे.बाकी संपूर्ण आपल्या पदरात आहे, भक्तांची इच्छा काय आहे? हे आपण जाणून घ्या! आपण भक्त मंडळींसाठी करत असलेली सेवा अतिशय चांगली आहे.त्यात थोडं सुधार करावा हीच सदिच्छा.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *