
File photo
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई,- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजप नारायण राणे यांचे नेते आमदार पुत्र नितेश राणे यांनी अपशब्दाचा वापर केला. या विधानाच्या निषेधार्थ पुण्यात तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या वतीने भाजप आमदार नितेश राणे यांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला l
या आंदोलनात राज्य समन्वयक शामिभा पाटील, निकिता मुखदल यांनी सहभागी होऊन भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
यावेळी तृतीपंथी हक्क समितीच्या राज्य समन्वयक शामिभा पाटील म्हणाल्या की, समाजामध्ये तृतीयपंथी व्यक्तिची एक ओळख असून आम्ही आमच्या हक्कासाठी आज देखील लढत आहे.
आम्हाला न्याय मिळावा यासाठी कोणताही लोकप्रतिनिधी पुढे येत नाही. पण, आमच्या समाजाबाबत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतेवेळी अपशब्दाचा वापर केला आहे. त्या विधानाचा आम्ही निषेध व्यक्त करत असून नितेश राणे विरोधात तक्रार करणार आहोत
आम्ही या बाबत न्यायालयीन लढाही लढणार आहेत.तसेच यापुढील काळात नितेश राणे जिथे भेटेल तिथे तोंडाला काळं फासणार असा इशारा तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आला आहे l