
प्रतिनिधी :सुरेश बोरले
भारतीय फिल्म जगातले सुप्रसिद्ध पाश्चर्व गायक मोहम्मद रफी यांना भारत रत्न देऊन भारत सरकार ने सन्मानित करावे ही भारतीय संगीत प्रेमिंची मनोकामना !
मुंबई,पुरस्कार किंवा बक्षीस, पारितोषिक या गोष्टी कोणी साध्या व्यक्तीला मिळत नाहीत, एका विशिष्ट सेवेंसाठी, एका विशेष कामात बेमालूम कामगिरी केली तरच पदक व बिल्ले दिले जातात. आपल्या समाजातील कलाकारांना खेळाडूंना मैदान गाजवल्यावर मिळतात.त्यासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्री कामगिरी करावी लागते. त्यासाठी तन मन धन अर्पून,भरीव कामगिरी आपल्या विश्वात करावी लागते. आज भारत रत्न पुरस्कार! माननीय परमपूज्य, बाबासाहेब आंबेडकर, सुर स्वामींनी,लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर! क्रिकेटचा विक्रमादित्य! झेंडू पळी चा परमेश्वर! इत्यादिनना त्यांच्या कामगिरीचा दर्जा व विक्रम पाहूनच दिलेल्या आहेत. प्रत्येकाच आपल काम करण्याचे क्षेत्र आहे. तर असाच एक विक्रमादित्य संगीत गायनाच्या कलेत, भारतीय सिने जगताच्या दुसऱ्या प्रहरात,क्षितिजावर उगवला! त्याने भारतीय सिने संगीत ढवळून काढली. समकालीन,सर्व लोकप्रिय कलाकारांसाठी,
पार्श्वगायन केलेले आहे. समकालीन महिला गायिकां बरोबर त्यांच्या, कलेचा मान ठेवून समरसतेने गाणी गायलेली आहेत. तर समकालीन एका पेक्षा एक संगीतकार बरोबर बेमालून कामगिरी केलेली आहे.तसेच समकालीन,गीतकारांचे पानावरचे शब्द! आपल्या मधुर कंठाने त्यांनी सुरेल गाण्यात गुंफले! अशा संगीताच्या जोरावर, महान कार्य करणारे पद्मश्री! स्वर्गीय,मोहम्मद रफी साहेब! यांना मानाचा कुर्निसात! आपल्या कलेने सगळ्यांची मन जिंकणारे, रफी साहेब, पैशासाठी! कधीच गायले नाहीत. कधी कधी तर ते, गाण्याचे पैसे पण घेत नसत. जर कोणी गायचे पैसे जास्त दिल्यास ते त्वरित, परत करीत असत. असे महान गायक आपल्या भारता साठी , एक आदर्श आहेत. आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने, त्यांनी चित्रपटांतील व चित्रपटांच्या बाहेरील गीत!त्यांनी सदाबहार गायलेली आहेत. ज्याप्रमाणे भारतरत्न पुरस्कार! लोकसेवा, राष्ट्रीय सेवेसाठी देतो, मग स्वर्गीय, साहेबांनी काय वेगळ केलेल आहे? त्यांनी सुद्धा संगीत क्षेत्रात, लाखो लोकांची मनोरंजनाची, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सेवा केलेली आहे. सतत चाळीस वर्षे हे त्यांनी काम केलेला आहे. तरी एकंदरीत 25 हजाराहून अधिक, गाणी त्यांनी गायलेली आहेत हा एक गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये एक विक्रमच आहे. त्यांच्या ह्या सामाजिक कामाला तोड नाही किंवा कोणाही गायकांचे त्यांना,आव्हानही नाही. इतकी मोठी कामगिरी त्यांनी करून ठेवलेली आहे. अनेक संगीतकारांचे ते मनाचे सर्ताज होते. तर काही नटांचे तर ते आवाज होते. त्यांच्या उसन्या गायकीने,अनेक चित्रपट चालले. लोकप्रिय कलाकारांसोबत, पार्श्वगायन करताना त्यांनी विनोदी कलाकारांसाठी ही गाणी गायलेली आहेत, ती पण लाजवाब आहेत.आज भारतात , स्वर्गी,रफी साहेबांचा चाहता कोणी नाही असा विरळाच. वयस्कर असो, तरुण असो, त्यांच्या गाण्यांचे प्रत्येकजण चाहते आहेत.ब्रिटिश कालीन पाकिस्तानातील लाहोर येथील, वास्तव्या नंतर, त्यांचे कुटुंब पंजाब प्रांतात अमृतसर कोटला,ह्या परिसरात स्थायिक झाले. पण स्वर्गीय, रफी साहेबांनी आपला देश आपला, देशाभिमान कधी सोडला नाही. देशप्रेमी गीत त्यांनी मनापासून गायलेली आहेत.आजही वाघा सीमेवर सायंकाळी त्यांची गाणी वाजवली जातात. विशेष सांगायचे झाले तर,1962 च्या भारत चीन युद्धात रफी साहेब स्वतः सीमेवर, युद्ध चालू असताना, जवानांसाठी त्यांचे मनोधैर्य वाढण्यासाठी गाऊन आलेले आहेत,आपल्या जिवाची परवाना न करता त्यांनी भारतीय, सैन्यया साठी ही एवढी मोठी कामगिरी केलेली आहे.असे पहिले भारतीय गायक आहेत.तर मुंबई ही महाराष्ट्राला मिळावी त्या चळवळीतही त्यांनी मोठ्या हिरोहिरेने भाग घेतला होता. गीत संगीत हेच आपलं काम नाही! तर देश सेवा समाजसेवा सुद्धा जरुरीची आहे, ती त्यांनी मनापासून केलेली आहे. हजारो गाणी अनेक देशी परदेशी भाषांमधून त्यांनी गायलेली आहेत.भारत रत्न हा किताब विक्रमादित्यांनाच मिळतो? मग स्वर्गीय,रफी साहेबांनी एकंदरीत या क्षेत्रात विक्रम केलेला आहे. अर्थात,भारत रत्न पुरस्काराने मानकरी ते आहेतच, ह्यात वाद नाही. कोणत्याही भारतीयाचा, विरोध या गोष्टीला नसेलच, सगळेच भारतीय या मतांची सहमत असतील. यात वाद नाही. कारण भारत रत्न पुरस्कारासाठी,जे लागते ते रफी साहेबांकडे अमाप आहे. म्हणून जनतेची मागणी जोर धरू लागलेलीआहे.त्यासाठी सह्यांची मोहिम, घेतली जात आहे. मला तर वाटते ही मोहीम का? असे वाटते!कारण सरकार दरबारी बसलेल्या, प्रत्येक माणसाला त्यांची कामगिरी माहिती आहे. सगळे राजकारणी हे कदरदान आहेत व त्यांच्या पश्चात त्यांना भारत रत्न पुरस्कार मिळावा ही,जनतेची अग्रगण्य मागणी आहे!ती पूर्ण, होईलच! असा विश्वास आहे.