प्रतिनिधी:सुरेश बोरले
भारतात ,कधीच एकता व समरसता होणार नाही!ही काळ्या दगडावरची रेघ आहे.आता हेच पहा ना,मराठा आरक्षणाच काय चाललंय?नागपूर कर म्हणत होते,आम्ही सत्तेवर आल्यावर मराठा आरक्षण! हा विषय त्वरित मार्गी लावू !मग आता तर आपण,शिवसेना व राष्ट्रवादीला खिंडार पाडून,आपण आता सत्तेच्याही पुढे आहात? विधान सभेत प्रचंड बहुमत ही आहे!मग करा ना आरक्षण?उगाच कशाला म्हणायचे,हा प्रश्न केंद्राचा आहे? फक्त बतावण्या करून,मतांची भिक मागायची!सत्तेवर आल्यावर येरे माझ्या मागल्या. जनतेची आपल्याला ताकीद आहे,नरेंद्र मोदीं मुळे आपण येथे आहात?पण जनता जनार्धन आपल्याला धूळ चारल्या शिवाय राहणार नाही? असो!आता नवीन गोम उठली आहे,मराठा आरक्षण!आता ओबीसी आरक्षणात वाढ करून,मराठा समाजाला आरक्षण द्या! हा कोणता न्याय?ह्यावर कुणबी समाजातील नेत्यांना हे मान्य नसल्याचे सांगितले असून,जर सरकारने असे पाऊल उचलले! तर कुणबी समाज रस्त्यावर उतरेल?ह्यात काय गैर आहे?का तुम्हाला ओबीसीच दिसताता का? का नाही तुम्ही इतर जातींच्या आरक्षणात हात घालत? सरकारला माहीत आहे,घटनाकार समितीने जे केले आहेत,त्यात बदल होणे शक्य नाही!कारण मग मोठे मोठे मोर्चे निघणार?मोडतोड ,सरकारी संपत्तीचे नुकसान?राज्याला आर्थिक झळ बसणार?मग शांत कोणता समाज आहे?ओबीसी कुणबी व इतर जमाती त्या कधी रस्त्यावर उतरत नाहीत?मग त्यांच्या कमरेत घाला बांबू?दुसऱ्यांना द्या आरक्षण!कारण मराठा समाजाचा शांततेने निघालेला मोर्चा राजकारण्यांना सहन झाला नाही.इत्रान सारखी हिन दर्ज्यांची जाळपोळ संपत्तीची हानी केली असती,मग ह्या मराठ्यांचा आवाज सरकार पर्यंत सहज पोहचला .कुणबी समाजानेही आता गप्पा बसू नये?हा कुटील डाव जर का सरकार खेळत असेल,तर मग सरकारच्या पचनी पडेल? असे आंदोलन लोकशाही मार्गाने करायचे. गप्प बसलेला कुणबी समाजाचा आवाज 1950 दशकात फक्त कै.श्यामराव पेजेननी उठवला होता.त्या नंतर राष्ट्रीय पातळीवर,कोणताच नेता झाला नाही.गलो गल्ली कुणबी संघटना व नेते आहेत!आता ह्या सगळ्यांची विचार करण्याचं वेळ आलेली आहे.ह्या सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन रणशिंग फुंकण्याची वेळ आलेली आहे.जेणे करून हा समाज एकवटला पाहिजे. सर्वानुमते निर्णय घ्यावा व जनते समोर ठेवावा!मगच योग्य निर्णय घ्यावा.हा निर्णय समाजाच्या हिताचा असावा.कारण कुणबी ही जात मराठा जातीची पोट जात आहे.तो शेतात,धरणी मातेच्या जमिनीवर राबतो!तो बळी राजा आहे.आज मुंबई,पुणे,नाशिक,कोल्हापूर सारख्या शहरात हा समाज विखुरलेला आहे.आज हा समाज सुशिक्षित आहे.प्रगती करतोय!अनेक कुणबी समाजाच्या व्यक्ती आता विदेशातही आहेत,त्यांनीही आपल्या समाजाकडे लक्ष द्यावे.कारण आपण ज्या प्रमाणे प्रगती केलेली आहे,त्या प्रमाणे येणाऱ्या पिढीलाही संधी मिळावी!त्यासाठी आपल्याकडून सहकर्याची अपेक्षा आहे?कुणबी समाजाने आता ही संधी सोडू नये.!