प्रतिनिधी :प्रकाश जैस्वार

मुंबई,बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानी मधील काही रक्कम दान करण्याचे आवाहन सफल विकास वेल्फेअर सोसायटी आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने मालवणीतील कार्यकर्ते निसार अली सय्यद,वैशाली सय्यद,शमा सय्यद,फिरोझ सय्यद, अफ्रोझ अन्सारी , यांनी केले होते.

कुर्बानी मधील काही रक्कम एकल महिलांच्या मुलांच्या शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी लोकांनी दिले होते. तसेच पॅराडाईज फाउंडेशन ने ही विद्यार्थ्यासाठी वह्या सामाजिक कार्यकर्ती मिशेल क्षीरसागर यांच्या हस्ते एकल महिलांच्या कुटुंबातील व गरजू असे150 विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्या मिशेल क्षीरसागर -वरिष्ठ सामाजिक कार्यकर्त्या यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले.

सय्यद निसार अली, वैशाली सय्यद,शमा सय्यद,फिरोझ अन्सारी, आणि त्यांची टीम गेले काही वर्ष बकरी ईद निमित्त कुर्बानी मधील काही रक्कम दान करण्याचे आवाहन करीत आहे.या रकमेतून त्यांनी आज पर्यंत अभिनेते सयाजी शिंदे यांनी सुरू केलेल्या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात झाडे लावण्यासाठी केलेल्या उपक्रमात आर्थिक साह्य केले आहे.सांगली,कोल्हापूर,चिपळूण येथील पूरग्रस्त गावात मदत पोहचवली आहे.तर कोरोना काळात प्लाझ्मा डोनेशन करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या कामाचे कौतुक समाजातील सर्व स्तरातून होत आहे.
प्रसंगी सफल विकास वेलफेअर सोसायटी आणि राष्ट्र सेवा दल चे कार्यकर्ते मेरी चेट्टी, कृष्णा वाघमारे, मनोज परमार, प्रकाश जैस्वार,राजकुमार ढिलोड, मंगल ओन्गलथे, व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Very nice . The real work. Thank you for inspiring all and helping people become aware of the right ways to be kind compassionate and doing good.
Thanks for your comment certainly it will help us to motivate.