
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई,मालाड,मालवणीत सफल विकास वेलफेअर सोसायटी, राष्ट्र सेवादल, मालवणी, काचपाडा आणि लाईफ विन्स फॉउंडेशन च्या वतीने मोफत कर्क रोग तपासणी शिबिराचे आयोजन शनिवार दि.4 नोव्हेंबर रोजी, सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत मालवणी क्रमांक 3, येथील गुजराती चाळीतील सफल केंद्रात करण्यात आले आहे. यात संपूर्ण शरीराची तपासणी निष्णात आणि तज्ञ डॉक्टर करणार आहेत.प्रसंगी एकाद्या व्यक्तीला रोग निदान झाले तर त्याचे उपचार ही मोफत करण्यात येणार आहेत.या संधीचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावे असे आवाहन आयोजक सचिव वैशाली महाडिक यांनी केले आहेत.