झलक नर्तिका हेलन च्या थिरकती अदा ची !

Share


प्रतिनिधी:सुरेश बोरले

हिंदी चित्रपटसृष्टीत नर्तिक्कांना एक वेगळच वलय आहे. त्यामध्ये भारतीय नृत्य विशेषता दाक्षिणात्य नृत्य आविष्कार करणाऱ्या नट्या अनेक होऊन गेल्या व आहेत.पण भारतिय फिल्मी दुनियेत,गुन्हेगारीच्या किंवा नट्टांच्या विरोधात घात करून,खलनायकाची तरफदारी करून, पश्चिमात्य नृत्य आविष्कार सादर करण ही एक प्रथाच हिंदी सिनेमात रुजू झाली.कारण पश्चिम सांस्कृतिच आकर्षण हे पहिल्यापासून,भारतीय लोकांना आहे. मग त्याची छाप फिल्मी दुनियेत प्रथम आली. त्याला कॅब्रे डान्स म्हणून प्रसिद्धी मिळाली.सुरवातीच्या काळात,स्व.बिब्बो ही नर्तिका हे काम करायची.पण नंतर ती ब्रिटिश पाकिस्तानात गेली.त्यानंतरचा काळ मात्र स्व.कुक्कु ह्या एंगलो इंडियन नटीने गाजवला.तिने भरपूर धन कमावले,तिच्या स्वांनांस दुसरी गाडी सफरीला असायची.पण ह्या नटीचा शेवट वाईट झाला.शेवटी तिच्याकडे औषधालाही पैसे नव्हते.शोमन स्व.राज कपूर ह्यांच्या सिनेमाची ती हुकमी एक्का होती.काळ बदलला चित्रपट ही बदलले.कृष्ण धवल ते रंगीत चित्रपट निर्मिती सुरू झाली.ह्या दोन्ही परवाची ह्याची डोळा ह्याची देहा,एक नरतकिने मात्र मोठा काळ गाजवला,तिच्या समकालीन नृत्यांगना होत्या उषा खन्ना, फरियाल,जयश्री टी,बिंदू,मुमताज वगैरे प,पण तिची सर कोणालाच नाही आली,ती नर्तकी व केब्रे डान्सर हेलेन! यांचा वावर प्रत्येक चित्रपटात असायचा.प्रत्येकाच्या मनात तिची नखरेल अदा भरलेली होती.तिला लोक अजूनही विसरलेले नाहीत.नेहमीच त्यांनी आपल्या नशिली नझरेच्या खलनायकी अदाकारी सहित कॅबरे डान्स ही केला.आत्ता त्या 85वयाच्या आसपास आहेत.पण अजूनही त्या मादक दिसतात.त्यांचं मूळ नाव हेलन जयराज रिचर्डसन.बॉलिवूड मध्ये कॅब्रे ही प्रथा ज्यांनी ठासून आणली! त्याच श्रेय हेलेंनजिंना जाते, हा त्यांचा सन्मान आहे.त्यांचे वडील एनगलो इंडियन. आई बर्मा देशातली.रिचर्डसन ह्यांना दुसऱ्या महायुध्दात वीरगती प्राप्त झाली.जपानने ब्रह्म देश जिंकला व त्यानी ब्रह्ममी लोकांचा छल सुरू केला.ही लोक वाट मिळेल त्या दिशेला पळू लागले.त्यामध्ये एक गट भारताच्या दिशेने पायी निघाला.1942साली त्यामधे 8वरष्याच्या असताना, हेलेंहिजी आपल्या आई सह निघाल्या. ब्रम्हदेशा तून खस्ता खात आसामच्या दिबृगड येथे हा जमाव विसावला.त्यांची आई व त्या भारतीय निर्वासित म्हणून कोलकत्ता येथे पोहोचल्या. पिताचे छत्र हरवल्या नंतर त्यांनी अनेक कस्टमय जीवन व्यथित केले. आई परिचारिका का म्हणून कामाल होत्या.त्यांना मासिक उत्पन्न पुरत नसे.ह्या गोष्टी लहान हेलेंजींना माहित होत्या.मग हे कुटुंब मुंबईत आले.त्यावेळेस स्व.कुक्कू नावाच्या फक्कड नर्तकी सोबत त्यांच्या परीवारची ओळख झाली आणि येथेच हेलेंजिंचे जीवन बदलले.१९ वया वर्षी 1951साली,क्ककुजिंनी पहिली संधी त्यांना शबिस्थान व आवारा सिनेमा मध्ये कोरस नर्तिका म्हणून दिली.आपल्या कुटुंबाला तारण्यासाठी,त्यांनी ही कामे स्वीकारली.त्यांनी 1954 आलिफ लैला,1955 ही ए अरब या चित्रपटांनी त्यांची आयटेम गर्ल म्हणून ओळख झाली.त्यांना अथक प्रयत्नाने 1957 साली,शक्ती समानता यांच्या “हावरा ब्रिज” ह्या सिनेमात प्रथम वैयक्तिक काम मिळाले.मग त्या पकय्या आयटेम गर्ल म्हणून फिल्मी जगतात स्थिर झाल्या.सुरुवातीला स्व.गीता दत्त ह्यांनी त्यांना सुंदर गाणाय्यांचा नझराणा पेश केला.त्यांच्यानंतर मात्र अशा भोसलेंनी आपला उसना आवाज दिला.आशा आणि हेलेन हे रसायनच तयार झाले.मग सिनेमे रंगीत झाले,मग मात्र ह्या जोडीनं एका पेक्षा एक गाण्यांचा नझरणाच प्रेक्षकांना पेश केला.1957 साली त्यांनी दिग्दर्शक प्रेम अरोरा यांच्याशी प्रेम विवाह केला.मग स्वतः अरोरा हे कंगाल झाले.अश्यावेळी त्यांनी हेलेंजीना न विचारता त्यांच्या पैशांचा व्यवहार केला,त्यांनी हेलेजिंनाही कंगाल केले.अश्यावरन दोघांचे संबंध 1974 साली संमप्ले,ते विभक्त झाले.मग 1981 साली त्यांनी फिल्म निर्माते,सलिमखान यांच्याशी पुनर्विवाह केला.ते नटवर्य सलमान खान यांचे वडील.तत्पूर्वी सलीम खान हे खलनायकी कामे करायचे.हेलेंजीनी 1965ते1970 पर्यंत स्टेज शो लंडन पॅरिस,हाँगकाँग सारख्या ठिकाणी केले.त्या 20वर्ष हूनही अधिक काळ कॅब्रेची राणी म्हणून फिल्मी दुनियेत वावर केला.यांनी हिंदुस्थानी नृत्य प्रकारातही आपले वर्चस्व गाजवले.त्यामध्ये शास्त्रीय संगीत आधारावर नाच असो,मुजरा असो इतर बाबत त्यांनी प्रविण्या मिळवलं होत.त्यांचं लचकती शरिरीक कांती हे त्यांच धन होत.ही कला त्यांनी अनेक चित्रपटांत पेश केली.अनेक दिग्गज आले गेले पण हेलेंजिंसारखी अदा कोणीच पेश करू शकले नाहीत.एकंदरीत 500हून अधिक चित्रपटात त्यांनी आपली अदा पेश केली.
हेलेंजिना मिळालेले परितोषकलिके
1965उत्कृष्ठ सह कलाकार गनमेंन फिल्म अवॉर्ड.
1968उत्कृष्ठ सह कलाकार एलान फिल्म अवॉर्ड.
1968 उत्कृष्ठ सह कलाकार खामोशी सिनेमा साठी.
1971उत्कृष्ठ फिल्म फेअर अवॉर्ड.
1979लहू के दो रंग.
1998 आजन्म पुरस्कार.
2009साली पद्मश्री भारत सरकार पुरस्कार.
वरील खिताबा सोबत 1973साली “नाच हेलेन”हा 30 मिनिटांचा लघुपट मर्चंट आयवेरी ह्या फिल्म कंपनीने काढला होता.तर “लाईफ ऑफ टाईमस ऑफ एच बॉम्बे 2007″हे जेरी पिंटो यांनी हेलेंजिंच आत्मवृत्त पुस्तकं लिहील तेही गाजल.
21 नोव्हेंबर,1938 साली ब्रम्ह देशात जलमा नंतर भारतात स्थायीक झालेल्या,भारतीय कलाकार म्हणून त्या खुश आहेत.1983 साली त्यांनी चित्रपट सन्यास घेतला असला, तरी अनेक सिनेमात सह कलाकार म्हणून,त्यांनी कामे केलेली आहेत.आपल्या आयुष्यातील दुसरे पती,सलीम खान व मूले कन्या अल्विरा खान,सलमान खान,अरबाज खान,सोहेल खान त्यांच्या सोबत उर्वरित आयुष आरामात जगत आहेत.आता त्या 85 वरश्यात पदार्पण करणार आहेत,त्या निमित्ताने त्यांना शुभेच्या!,हेलेनजिंची फिल्मी दुनियेतील लचकती व थीरकतीअदांचे पर्व भारतीय प्रेक्षक कधीच विसरणार नाहीत.मुख्य नटीनाही आव्हान देणाऱ्या व फिल्मी दुनियेची बऱ्याच काळ सेवा करणाऱ्या ह्या रंग कर्मिंला मानाचा मुजरा!


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *