
प्रतिनिधी :सुरेश बोरले
मुंबई,आधीच मुंबईत उद्यानांची कमतरता आहे. अशावेळी जी उद्याने नारिकांना उपलब्ध आहेत,ती कचरा व घाणीच्या साम्राज्याने नटलेली आहेत.अंधेरी पूर्व कैलासवासी, रमेश मोरे चौका समोर असणाऱ्या,रमेश मोरे उद्यानाचे उदाहरण देता येईल?ह्या उद्यानात कचऱ्याचा उपसा होताना दिसत नाही.आपण उद्यानात प्रवेश केल्यास,डाव्या बाजूला पालापाचोळा व कचरा साचलेला दिसतो.त्याचा ढीगच तयार झालेलं आहे.त्यामुळे येथे दुर्गंधी कचरा कुजल्यावर पसरण्याची शक्यता आहेच,त्याशिवाय येथे आरोग्य स्वास्थ्यासाठी चालायला व कसरती करणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी व डासांचा त्रास होणार आहे.तसा त्रास डासांचा नित्य होतच आहे.तर
तर अनेक कीटक व कृमी ह्या कचऱ्याने निर्माण होणार आहेत,ज्या आरोग्यासाठी नागरिकांना घातक आहेत.हे निश्चित!कारण कचरा व्यवस्थापन ह्या उद्यानात होताना दिसत नाही.एकंदरीत येथे पाहिल्यावर लक्षात येते.ह्या उद्याना समंधित खाते व अधिकारी तथा कर्मचाऱ्याचे लक्ष येथे व्यवस्थित दीसत नाही.ह्या उद्यानात बरीच कामे अर्धवट पडून आहेत,त्यामळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.नागरिकांची पालिकेला विंनंती आहे की,उद्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येथे लक्ष घालावे.महत्वाचे म्हणजे कचरा व्यवस्थापन होणे ह्या ठिकाणी आवश्यक आहे.ते चांगले झाल्यास,नागरिकांना त्रास कमी होऊन,त्यांचे आरोग्य चांगले राहील.येणाऱ्या काळात जर का येथे निष्काळजीपणामुळे,
कचऱ्याला “आग “लागल्यास त्या आगीचा वणवा पेटून नुकसान झाल्यास, जबादार कोण?ह्याची जाणीव हाकेच्या अंतरावर असणाऱ्या,महापालिकेच्या कचेरीने घ्यावी व नागरिकांना चांगल्या आरोग्यासाठी सहकार्य करावे.
