
प्रतिनिधी:सुरेश बोरले
मुंबई,विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्य गृहात,स्व.लता दीदींच्या कनिष्ठ भगिनी व प्रसिद्ध गायिका” पद्मविभूषण” सन्मानित!आशा भोसले ह्यांच्या,”सर स्वामींनी” पुस्तकाचा प्रकाशन!सोहळा,व्हॅल्यूअबल ग्रुप व जीवन गाणी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने रा स्व.संघ.चालक मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडला.त्या प्रसंगी मान्यवरांचे भाषणे झाली .त्यामधे अँड. अशीश शेलार त्यांनी आपल्या भाषणात,आशा ताईंनी अनेक विरह,दुःख,तसेच वैयक्तिक हानी सहन करीत,आपले कुटुंब सांभाळत,त्यांनी गायन क्षेत्रात,जे नाव व लोकप्रियता कमावली आहे, त्याला तोड नाही.त्याची माहिती दिली.तर आशा ताईंचे कनिष्ठ बंधू “पद्दमभूषण” सन्मानित रूदयनाथ मंगेशकर,ह्यांनी लहानपणीच्या गरीबितील आठवणींना उजाळा देत!आशाजिंनी त्यांना कसं सांभाळून,मार्गी लावल.त्या आठवणी ताज्या केल्या.तर शेवटी संघ चालक मां.मोहन भागवत ह्यांनी,मंगेशकर घराण्याने संगीत व गाय क्षेत्रात राष्ट्राला दिलेलं योगदान व खास करून आशा ताईनी घेतलेली मेहनत व कमावलेली लोकप्रियता ,तसेच ह्या साधनेतून केलेली लोकांची सेवा.ह्यांचे गोडवे गायले.दरम्यान प्रसिद्ध पार्शव गायक सोनू निगम,ह्यांनी आशा ताइंचे पाय गुलाब पाण्याने धुवून,त्यास चंदन लेप लावून साष्टांग नमस्कार करीत,त्यांचे व भागवतांचे आशीर्वाद घेतले.नव्वददि पार केलेल्या!आशा ताईंचा 91दिपकांनी सुहासिनीनी त्यांचे औक्षण केले.आपल्या आभार प्रदर्शनात आशाजीननी प्रेक्षकांचे,दिग्दर्शकांचे,संगीतकारांचे ,गितकरांचे,ध्वनी मुद्रंकरांचे,ज्यांनी ज्यांनी आपल्या यशात सहकार्य केले,त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानले. व्हॅल्यूअबल ग्रुप प्रस्तुत कलाकारांनी आशाताईंनी सुंदर गाणीही पेश केली. तद प्रसंगि उपस्थित गायक, कलाकार,सहायक, व मान्यवरांना पुस्तक भेट देण्यात आले.त्या
मधे.राज दत्त,त्यामधे अशोक व निवेदिता सराफ,सुरेश वाडकर अनुराधा पौडवाल,रवींद्र साठे,श्रीधर फडके, डॉ.तात्याराव लहाने आदींचा समावेश आहे.ह्या कार्यक्रमाला ,रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.