
विशेष प्रतिनिधी :
इचलकरंजी : साने गुरुजी 125 अभियान अंतर्गत विविध उपक्रम महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहात सुरु आहेत. साने गुरुजी साहित्यिक अंगाने महाराष्ट्राला ज्ञात आहेत त्यामुळे त्यांचे साहित्य पुन्हा एकदा समाजात सर्वदूर पोहोचावे यासाठी मालती माने विद्यालय इचलकरंजी येथे मुख्याध्यापक तथा कोल्हापूर जिल्ह्याचे समन्वयक संजय रेंदाळकर यांनी पुस्तक भिशीसाठी आवाहन केले. यामध्ये ग्रंथालय प्रमुख मनिषा कांबळे यांनी पुढाकार घेऊन या उपक्रमाला आकार द्यायचे ठरवले.
या उपक्रमात सहभागींना साने गुरुजींची तसेच अलिकडे प्रकाशित झालेली नामांकित प्रकाशने तथा शिक्षणविषयक पुस्तके दिली जाणार आहेत. पहिल्या भिशीचा जबाबदारी घेणाऱ्या मनिषा कांबळे यांना देण्यात आला. त्यांना बालवाडी प्रमुख ज्योती पाटील यांनी पुस्तके सुपूर्द करुन या भिशीचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.
यावेळी सुनिल कोकणी, अंजना शिंदे, जयश्री मांडवकर, अमृता कदम, सुप्रिया हांडे, धनश्री सुतार, स्मिता सुतार, रुपाली हजारे, सुप्रिया माने हे आवर्जून उपस्थित होते. याचे संयोजन संजय रेंदाळकर यांनी केले.