काश्मिरी अतिरेक्यांकडे,अमेरिकन शस्त्रे?

Share


प्रतिनिधी:सुरेश बोरले

दिवसें दिवस काश्मिरी खोऱ्यात,अतिरेक्यांच्या वाढत्या विघातक कारवाया व शेजारच्या राष्ट्रांकडून होणारी घुसखोरी आणि अचानक आपल्या सैनिकांवर होणारे, जीवघेणे हल्ले! त्यामधे नाहक आपले जवान शहीद होत आहेत.ही एक मोठीं दुखाची बाब आहे.कारण ह्या कुटुंबीयांचा बोजा आहे तो शेवटी,आपल्यावरच पडतो.राष्ट्राचा बराचसा आर्थिक बोजा ह्या कारणास्तव बराच वाढतो आहे.परंतु हे अतिरेकी वापरत असलेली अत्याधुनिक शस्त्रे!ही अमेरिकन बनावटीची आहेत.जेंव्हा अतिरेकी मारले जातात,त्यावेळेस जो शस्त्र साठा जमा केला जातो,त्यामधे ही हत्यारे सापडतात व त्यावर मेड इन अमेरिका हे स्पष्ट कोरलेल असत.तपासा अंती असे समजते की, सदर शस्त्र साठा! हा अफगाणिस्थानाकडून,पाकने खरेदी करून तो अतिरेक्यांना पुरवला असावा त्यामधे एम -4,कारबाइन , ए के -47,छोटे बॉम्बस,हाथ गोळे वगैरे अशी महागडी शस्त्र संग्रहित आहेत.अधिक माहिती अशी समजते की,जेव्हा अमेरिकन लष्कराने! तेथील बंडा नंतर अफगाणवर सैनिकी ताबा मिळवलयावर, परत जाताना हा शस्त्र साठा! ते तसाच ठेऊन गेले.हा साठा मग पाकी सैन्याने विकत घेऊन, तो अतिरेकी कारवाई करिता!अतिरेक्यांना देण्यात आला. पाक चा हा डाव अमेरिकेलाही, ह्या गुंत्यात अडकवायचे आहे.पण ह्या आधुनिक शस्त्राने, अतिरेकी आणखीनच पावरफुल होत आहेत.म्हणून ते विघातक असे,या शस्त्रांच्या आधारे!मोठे स्फोट घडवत आहेत.ही एक चिंतेची बाब भारतीय सैन्यासाठी आहे.पाहू! आता डोडा तसेच उधमपूर भागात सैन्य रात्रंदिवस गस्त करीत आहे.अपेक्षा एकच अतिरेक्यांच्या लवकरात लवकर खात्मा!


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *