
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई,बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्टच्या वाहतूक विभागातून निवृत्त झालेले वाहतूक अधिकारी मकसूद आलम हबीबउल्लाह अन्सारी यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ मालवणी आगारात उत्साहात पार पडला. अन्सारी हे 3 जुलै 1989 रोजी नोकरीस रुजू झाले. त्यांनी बेस्ट उपक्रमात विविध विभागात अनेक पदे भूषवली. कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि प्रेमळ वृत्तीचे अधिकारी आणि व्यक्ती अशी त्यांची ओळख होती. त्यांनी तब्ब्ल 35 वर्षे 1 महिना बेस्टमध्ये सेवा केली . सेवानिवृत्ती च्या सोहळ्यास शिवादसन नंबियर डेप्युटी चीफ मॅनेजर (वेस्ट झोन ), महादेव वीरकर -डेपो मॅनेजर-मालवणी, विल्सन लेवीसडेपो मॅनेजर -दिंडोशी, सुनील प्रभू देसाई -डेपो मॅनेजर -मालाड,कृष्णा माली-असिस्टंट इंजिनिअर -सिवील विभाग, राजेश पांडे -वरिष्ठ वाहतूक अधिकारी, विनायक मेस्त्री -वरिष्ठ वाहतूक अधिकारी,हरीश शेट्टी -वरिष्ठ वाहतूक अधिकारी तसेच त्यांचे सहकारी, कुटुंबीय, मित्रमंडळी उपस्थित होती. उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढून अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांना मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. बेस्ट कर्मचाऱ्यांनी विशेष गाणे गात अन्सारी यांना शुभेच्छा दिल्या.तसेच अन्सारी यांनी भावुक होत अधिकाऱ्यांचे, सहकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करत आज जे काही त्यांनी मान सन्मान कमवले ते बेस्ट उपक्रमा मुळेच असे बोलत त्यांनी रजा घेतली.
