
प्रतिनिधी :मिलन शहा
दिल्ली :पत्रकार अभिषेक उपाध्याय यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.तसेच न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलिसांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात असे लिहिले आहे की, पत्रकाराचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य घटनेच्या कलम 19(1) द्वारे संरक्षित आहे.केवळ सरकारवर टीका करण्यासाठी कोणत्याही पत्रकारावर गुन्हा दाखल करू नये.या निर्णयाने पत्रकारांना मोठा दिलासा मिळाला आहे तसेच कोणत्या ही सरकार ह्या चुकीच्या धोरण किंवा कार्या विरोधात बातमी करणाऱ्या पत्रकारांना आपले काम सक्षमतेने करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
