प्रतिनिधी :मिलन शहा.
उत्तर प्रदेश :यूपी काँग्रेसने बागपत जिल्हाध्यक्षावर मोठी कारवाई केली आहे. काँग्रेसचे बागपत जिल्हाध्यक्ष युनूस चौधरी यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे.
शनिवारी, त्याचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये तो एका मुलीसोबत आक्षेपार्ह कृत्य करताना दिसत आहे. गेल्या शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. नेत्याच्या वागण्यावर लोक गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र या कथित विडिओ च्या सत्यते बाबत आम्ही पडताळणी केलेली नाही.