
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई :महाकवी नामदेव ढसाळ कविता एल्गार हा कार्यक्रम गुरुवार दिनांक 13 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे. केशव गोरे स्मारक ट्रस्ट, आरे रोड, गोरेगाव पश्चिम येथे हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात लोकशाहीर संभाजी भगत, कवयित्री साहित्यिक नीरजा, प्रज्ञा पवार, अभिनेत्री चिन्मयी सुमीत, अभिनेता हेमंत ढोमे, कैलास वाघमारे, अक्षय शिंपी, दीपक राजाध्यक्ष, पत्रकार मंदार फणसे, युवराज मोहिते आदि सहभागी होणार आहेत.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून श्रोत्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे.