
file photo
प्रतिनिधी :मिलन शहा
झाडे तोडणे म्हणजे माणसांना कापण्यासारखे आहे: सर्वोच्च न्यायालय..
मोठ्या प्रमाणात झाडे तोडणे हे माणसाला मारण्यापेक्षाही वाईट आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले.
पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांवर दया दाखवता कामा नये.
बेकायदेशीरपणे तोडलेल्या प्रत्येक झाडासाठी १ लाख रुपये दंड आकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे.
तसेच, दंडाविरुद्ध दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली.
न्यायमूर्ती अभय एस ओका आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईयान यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, संबंधित प्राधिकरण किंवा संस्थेची परवानगी घेतल्याशिवाय कोणतीही व्यक्ती झाड तोडू शकत नाही.
Great