
प्रतिनिधी :मिलन शहा
पहाटे 1:30 वाजता हवाई हल्ल्यात 9 दहशतवादी तळ ध्वस्त..
दिनांक 7 एप्रिलच्या रात्री भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर मोठे हवाई हल्ले केले. ही कारवाई भारतीय हवाई दल, भारतीय लष्कर आणि नौदलाची संयुक्त कारवाई होती. यानंतर, पाकिस्तानने फक्त 6 ठिकाणांवर हल्ला केल्याचे मान्य केले आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून कठोर कारवाईची धमकी दिली आहे, परंतु भारताने सर्व तयारी केली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 15 व्या दिवशी, भारताने दहशतवादाला प्रत्युत्तर दिले आहे आणि दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले आहे. ही कारवाई भारतीय हवाई दल, भारतीय लष्कर आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे केली. या हल्ल्यासाठी हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.
Great Reply toterrorist