प्रतिनिधी :मिलन शहा
भारतात, जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट सारखी महत्त्वाची विमानतळे सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरती बंद करण्यात आली आहेत.
हे नऊ सर्व विमानतळे 10 मे रोजी सकाळी 5.30 वाजेपर्यंत बंद राहतील. हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे आणि प्रवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूरनंतर उद्भवलेल्या सुरक्षा परिस्थिती आणि संभाव्य प्रति-धोक्यांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व विमानतळांवर हवाई दल आणि सुरक्षा एजन्सींची तैनाती वाढवण्यात आली आहे आणि देशभरात सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
Ohh