प्रतिनिधी :सुरेश बोर्ले
मुंबई :विलेपार्ले स्थानक पूर्व येथे वाहने त्वरित टोविंग करतात मात्र पद पाथवर अनधिकृत फेरी वाले चालतात…
दीनानाथ नाट्यगृह किंवा मनपा मंडई समोर कोणतेही वाहन पार्क केल्यास, त्वरित ट्रॅफिक पोलिसवाले चित्त्याच्या फुर्तीने ती वाहने टोविंग करतात. मात्र त्याच वेळी तेच पोलीस अनधिकृत फेरी वाले, पावभाजी वाल्या बरोबर दुचाकीवर बसून गप्पा मारताना दिसतात . तर अनेक वेळी पोलिस वॅन ही पावभाजीवल्या समोर बराच वेळ उभी असते.तो अनधिकृत फेरीवाला मस्तपणे आपला धंदा निर्धास्त पणे करतोय,पण वाहने येथे पार्क केलेली चालत नाही.हा कोणता न्याय आहे.ट्रॅफिक पोलिस व मनपा येथे उघडपणे आप आपला स्वार्थ जपताना दिसत आहेत.असे हतबल झालेले पार्लेकरांचे मत आहे.
कधी परिस्थिति सुधारनार?