
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई :नशा मुक्त भारत अभियान आणि वर्ल्ड नो टोबॅको डे च्या निमित्ताने ब्रह्माकुमारीज तर्फे मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या उपनगरांपैकी एक असलेल्या मालाड वेस्ट स्थानकावर, जिथून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात, तेथे नशा मुक्तीचा भव्य उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
हजारो लोकल ट्रेन प्रवाशांनी थांबून नशा मुक्तीवरील नाटक पाहिले व समजून घेतले. या नाट्यातून त्यांना सात दिवसीय विनामूल्य राजयोग मेडिटेशन कोर्स विषयी माहिती देण्यात आली, आणि हे ध्यान कसे तंबाखू, दारू यांसारख्या व्यसनांपासून, तसेच आजारपण आणि तणावापासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त आहे, हे स्पष्ट करण्यात आले. अनेकांनी कोर्ससाठी आपली नावे नोंदवली.
३० मेच्या संध्याकाळी कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी चित्रपट व टी.व्ही. अभिनेता जितेंद्र भारद्वाज तसेच बी.के. नीरजा बहन, मनीषा बहन, स्वाती बहन, संध्या बहन आणि संजय भाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
नीरजा बहन यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला आणि सर्वांना मेडिटेशनसाठी प्रेरित केले. जितेंद्र भारद्वाज यांनीही आपल्या शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की, “आज समाजामध्ये व्यसनांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, आणि जनजागृतीसाठी हे सुंदर नाट्य सादर करून आपण एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.” प्रमुख अतिथींचा सौगात आणि मिठाई देऊन सन्मान करण्यात आला.
३० आणि ३१ मे रोजी स्थानक परिसरात एलसीडीद्वारे मेडिटेशनचे फायदे व नशा मुक्ती नाटकाचे प्रसारण करण्यात येत आहे. तसेच पाम्फ्लेट्स वाटून नशेचे दुष्परिणाम आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी प्रेरणा दिली जात आहे.
“प्रवासी कृपया लक्ष द्या”! राजयोग मेडिटेशन व व्यसनमुक्तीवर आधारित चित्रप्रदर्शने लावण्यात आली असून अनेक प्रवासी त्याचा लाभ घेत आहेत.
नशा मुक्तीचे स्लोगन व प्लेकार्ड्स द्वारे सर्व प्रवाशांना असा संदेश दिला जात आहे की राजयोग मेडिटेशनच्या सरावाने नशेच्या सगळ्या सवयींपासून मुक्त होता येते.

Good