प्रतिनिधी :निसार अली सय्यद

जम्मू काश्मीर :’हम भारत के लोग’ च्या सद्भाभावना अभियानात नांदेड ते जम्मू -काशमिर अंतर्गत आज दिनांक १ जून २०२५रोजी पहेलगाम येथील “हातनाडा” या गावी पोहोचलीं.
दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी पहेलगाम येथील पर्यटन स्थळावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात सय्यद अदिल हुसेनशाहा घोडा हकनारा हा अतिरेक्यांची बंदूक हिसकावून पर्यटकांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्या झटापटीत त्याला गोळ्या लागून जागीच शहीद झाला.
एक मुस्लिम असून त्याने कित्येक हिंदू -मुस्लीम बांधवांचे प्राण वाचवले म्हणून संपूर्ण देश त्याला सलाम करतो,
त्याचाच एक भाग म्हणून हम भारत के लोग च्या पथकाने आज त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नी,आई,भाऊ, बहिण या सर्वांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
या वेळी सद्भावना अभियान श्याम निलंगेकर,कॉ.विजय गाभणे,अभियंता भरतकुमार कानिंदे,प्रा.प्रल्हाद हिंगोले, संगीता गाभणे,पत्रकार रमेश मसके,सोपानराव मारकवाड, नारायणराव दोतुलवाड व अनंतनाग जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते.

Its great work done. Aap sab ke jazbe ko salam hai.