
प्रतिनिधी :सुरेश बोर्ले
रायगड:! श्रीवर्धन येथील एस टी डेपोची दुरावस्था.
प्रतिनिधी….कोकणातील श्रीवर्धन तालुका हा आता पर्यटक स्थळ म्हणून नावारूपाला आलेला आहे.येथील नारळी पोफळीच्या बागा व विस्तीर्ण समुद्र किनारा, हा पर्यटकांना आकर्षित करतो.त्यामुळे येथे नेहमीच त्यांची वर्दळ असते.पण हे पर्यटक ज्या एस टी ने येतात,त्या एस टी डेपोची,अक्षरश दुरावस्था झालेली आहे.अनेक ठिकाणी डेपो इमारतीची रखडलेली दुरुस्तीचे कामे,तर ह्या डेपोला मुख्य दरवाजा नसल्याने! डीपोच्या आवारात रिक्षा,टेम्पो, टम टम,समुद्राच्या सफारी गाड्या येथे बीन दिक्कतपणे लोक उभ्या करतात. मोकाट जनावरेही डेपोत वाहन मार्गावर ऊभी असतात.त्यामुळे ही जनावरे उधळून प्रवाश्यांना धडकी देतात.एस टी गाड्यांना धडक देतात.अनेक अपघातही येथे जालेले आहेत.शिवाय डेपो बाहेर फेरीवाल्यांचा गराडा पडलेला आहे.सदर बाबत डेपो व्यवस्थापक व अधिकारी, स्थानिक आमदार,खासदार नगर परिषद अधिकारी,पोलिस कर्मचारी तसेच स्थानिक समाज सेवक ह्यांनी सदर समस्यांकडे,लक्ष घालून!स्थानिक लोकांची आणि पर्यटकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर पकडत आहे.
STकड़े लक्ष्य द्याल महत्वाचे साधन