महिला खासदार आणि त्यांचे पती ठार दुसरे खासदार आणि त्यांची पत्नी जखमी..
अमेरिकेतील मिनेसोटा येथील दोन डेमोक्रॅटिक खासदारांना त्यांच्या घरात गोळ्या घालण्यात आल्या. पहिल्या घटनेत डेमोक्रॅटिक राज्य प्रतिनिधी मेलिसा हॉर्टमन आणि त्यांचे पती मार्क यांचा मृत्यू झाला आहे.
दुसऱ्या घटनेत डेमोक्रॅटिक राज्य सिनेटर जॉन हॉफमन आणि त्यांची पत्नी यवेट यांच्यावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. दोघेही जखमी आहेत. दोघांवरही शस्त्रक्रिया झाली आहे आणि डॉक्टरांना आशा आहे की ते वाचतील.
ही माहिती मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्झ यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की हा हल्ला राजकीय कारणांसाठी करण्यात आला आहे.
वॉल्झ म्हणाले की मिनियापोलिसजवळील दोन भागात – चॅम्पलिन आणि ब्रुकलिन पार्कमध्ये गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत आहोत.
Very sad