
प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले
मुंबई :जॉय ऑफ गिविंग संस्थेचा वर्धापन दिन शनिवार दिनांक ७ जून रोजी जोगेश्वरीच्या अस्मिता भवन सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी डॉ एम डी वळंजू, अविनाश दौंड, सत्येंद्र सामंत, डॉ महेश अभ्यंकर, राजेंद्र घरत, रूषीला रिबेलो, जगदीश जायले, आदी मान्यवरांच्या हस्ते ठाण्यातील आघाडीच्या स्तंभ लेखन करणाऱ्या वृत्तपत्र लेखिका लीना बल्लाळ यांना आदर्श वृत्तपत्र लेखिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.शाल, मानचिन्ह, मेडल , सन्मानपत्र यावेळी त्यांना देण्यात आले.श्रीमती लीना बल्लाळ ह्यांनी जॉयच्या दशक लीना बल्लाळ ह्या ठाण्यातील श्रीरंग शिक्षण संस्थेच्या शाळेच्या निवृत्त शिक्षिका असून दैनिक ठाणे वैभव मधून त्या सध्या दत्मभलेखन लेखन करतात. मला आयुष्याच्या दुसऱ्या इनिंग मध्ये मिळालेले ॲवार्ड हे खरोखरच कौतुकास्पद ठरत आहे असे पुरस्कार मिळाल्यावर बल्लाळ म्हणाल्या आणि मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांनी जॉयचे आभार मानले. गणेश हिरवे हे जॉयचे सर्वस्व असल्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी चारोळी लिहली आहे.
गणेश नावात आहे वरदहस्त
हिरवे आडनावात चैतन्याची हिरवळ
जॉय एक संस्था नसून आहे चळवळ
संराच्या कार्याचा पसरला सर्वत्र दरवळ
Good