पहिल्याच पावसात जनकल्याण रस्त्याची चाळण झाली..

Share

प्रतिनिधी :प्रकाश जैस्वार

मुंबई :मालाड पश्चिमेतील  बाफहीरा नगर ते जनकल्याण नगर ला जोडणारा जनकल्याण नगर रस्त्याची चाळण झाली. या रस्त्याचे अर्धवट काँक्रिटिकरण झाले आहे व श्रीराम भवन ते क्रॉस दरम्यान चा रस्ता असाच पडला आहे तसेच जेमिनी बिल्डिंग ते वंदना  सदन दरम्यान च्या रस्त्याचे काम रखडल्याने या रस्त्यावरील डांबर निखळून पडले आहे तसेच  जागो जागी खड्डे पडल्याने संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे जरी या रस्त्याचा काही भागाचे काँक्रिटिकारण झाले असले तरी ज्या भागाचे काँक्रिटिकरण नाही झाले तिथे रस्त्याचे लेव्हलिंग झालेले नाही त्यामुळे एकी कडे सिमेंट आणि दुसरी कडील डांबर असल्याने डांबर निखळल्याने संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे.त्यामुळे  येथील वाहतुकीवर ही परिणाम होत आहे तसेच येथे शाळा, दोन बँका आणि इतर व्यवसायिक आस्थापणे असल्याने हा महत्वाचा आणि पादचारी आणि वाहणांची वर्दळ प्रचंड असते. त्यामुळे कमीत कमी हे खड्डे त्वरित विजवावे आणि नवीन गटाराचे काँक्रिटिकरण करण्यात आल्याने रस्त्यावरील पाणी जाण्यासाठी चे होल बंद झाल्याने काही ठिकाणी पाणी साचत आहे ते ही होल खोलण्यात यावे अशी मागणी रहिवाशांची आहे.


Share

One thought on “पहिल्याच पावसात जनकल्याण रस्त्याची चाळण झाली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *