
प्रतिनिधी :वैशाली महाडिक.
मुंबई :नवीन शैक्षणिक वर्षातला आज शाळेचा पहिला दिवस. त्यादिवशी मुसळधार पाऊस असून देखील नंदादीप विद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली होती.
विद्यार्थ्यांना नवीन पाठयपुस्तकांचे वितरण केले नवीन पुस्तके पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून जात होता. वर्गातील हजेरी घेऊन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गोष्टींची पुस्तके वाचायला दिली गेली. एक तास मुलांनी गोष्टींच्या पुस्तकांचे वाचन केले. अंदाजीत शाळेतील विद्यार्थी आपल्या वाढदिवसादिवशी शाळेला पुस्तके भेट देतात.तीच पुस्तके विद्यार्थ्यांना वाचायला दिली गेली होती. मधल्या सुट्टीत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना गोड खाऊ दिला. शाळेच्या डॉ. भानुबेन नाणावटी कलाघरामध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या उपक्रमांचे आणि अन्य मनोरंजनपर व्हिडीओ दाखवले. यावेळी अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यवाह श्रीमती माधुरी पाटील यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या सदिच्छा देऊन त्यांच्याशी मार्गदर्शनपर संवाद साधला.तसेच मुख्याध्यापक अर्जुन जगधने, के पी. पूर्व च्या समन्वयक माधवी मालवदकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना, 100टक्के उपस्थिती, स्वच्छता, शिस्त, गृहपाठ आणि शिवीमुक्त शाळा ही पंचसूत्री दैनंदिन शालेय जीवनात अवलंबिण्याचे आवाहन केले. यावेळी पर्यवेक्षक जयसिंग राजगे समन्वयक राजश्री साळगे व इतर शिक्षकांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
