झोपडपट्टीच्या प्रश्नांवर काँग्रेसचा SRA ऑफिस वर मोर्चा.

Share

प्रतिनिधी:मिलन शहा
मुंबई :मुंबईतील सामान्य जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते पण सत्तेतील नेते व प्रशासनातील अधिकारी यांना जनतेचे काही देणेघेणे नाही. एसआरएसंदर्भात जनतेच्या मुद्द्यांवर खासदार वर्षा गायकवाड यांना एसआरएचे मुख्याधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी भेट दिली नाही. कल्याणकर या अधिकाऱ्याला कशाचा माज आला आहे, जो लोकप्रतिनीधीला भेटत नाही. अशा मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.

एसआरएकडून मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांची बैठक निश्चित करण्यात आली होती. पण या बैठकीला मुख्याधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी येणे टाळले. ते कार्यालयातच काही बिल्डर व सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसी बोलत बसले होते. कल्याणकर यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल होणार होती म्हणून त्यांनी खासदार गायकवाड यांच्याबरोबरची बैठक टाळली. जवळपास 2 तास प्रतिक्षा करून वर्षा गायकवाड परत निघाल्या. महेंद्र कल्याणकरने जाणीवपूर्वक भेट टाळली. कल्याणकर हे जनतेचे सेवक आहेत, मालक नाहीत याचे त्यांना भान असायला हवे. लोकप्रतिनिधी जनतेची कामे घेऊनच अधिकाऱ्यांना भेटत असतात. महेंद्र कल्याणकरला जर वेळ नसेल तर राजीनामा देऊन घरी बसावे. जनतेची कामे न करणारे, लोकप्रतिनीधींना भेटण्यास वेळ नसणाऱ्या कल्याणकर यांना पदावर राहण्याचा काही एक अधिकार नाही.

वर्षा गायकवाड यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. या घटनेचा आम्ही निषेध करतो. एसआरए मधील गैरकारभार, अधिकाऱ्यांचा मुजोरपणा यासह विविध प्रश्नांवर मुंबई काँग्रेस उद्या बुधवारी दुपारी दोन वाजता एसआरएच्या वांद्रे येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याची माहितीही राजहंस यांनी दिली.


Share

One thought on “झोपडपट्टीच्या प्रश्नांवर काँग्रेसचा SRA ऑफिस वर मोर्चा.

  1. मॅडम पोलीस प्रशासनात पोलीस आयुक्त बृहन्मुंबई कार्यालयात पण हीच अवस्था आहे.जवळ जवळ सर्वच ठिकाणी असे धंदे चालू आहेत.फेसबुक लाईव्ह दाखवायला पाहिजे आपण.सर्वांना बघू द्या.लोकप्रतिनिधींची ही अवस्था आहे तर सर्व सामान्य जनतेचे काय परिस्थिती असेल आपण थोडा विचार करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *