
विशेष प्रतिनिधी :
मुंबई :मालाड मधील स्वामी नारायण मंदिर आजी माजी विश्वासतांच्या वादात दोन महिलांचे विनय भंग. अमरशी रोड मालाड पश्चिमेतील स्वामी नारायण मंदिराचे आजी माजी विश्वासतांचा वाद विकोपाला गेला आणि जुन्या आणि नवीन विश्वासतांचा वाद वाढल्याने जुन्या विश्वसतांनी समितीची विशेष बैठक दिनांक 22 जून रोजी मंदिर असलेल्या इमारत व मंदिराचे पुनरविकास बाबत बोलावली होती. पण वीज गेल्याने बैठक पुढे ढकलण्यात आली. बैठक मंदिरात ठेवण्यात आल्याने जुन्या आणि नवीन पुरुष समिती सदस्य आणि महिला सदस्य एकत्र बैठकीला उपस्थित होते. तसेच कांदिवली, बोरीवली, डोंबिवली, वसई, घाटकोपर येथून सुद्धा काही हितचिंतक उपस्थित होते. येथे झालेल्या क्षुल्लक वादाटून प्रदिप बारोट, उमंग चंदन, बकुल जियानी हे लोक व्हिडिओ व फोटो काढू लागले. त्यावेळी महिला सदस्यांनी त्यांना तुम्ही का फोटो व व्हिडोओ काढत आहेत असे विचारू लागल्यावर त्यांची महिला सदस्य सोबत शाब्दिक बाचा बाची झाली. व त्या दरम्यान प्रदिप बारोट, उमंग चंदन, बकुल जियानी दोन महिला सदस्यांचे विनय भंग केल्या आरोपात त्यांच्या विरोधात मालाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिते च्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलं आहे. मालाड पोलीसांनी आरोपिंना अटक केली होती तसेच आरोपी जामिनीवर बाहेर आलेत. या घटने ने परिसरात तनावाचे वातावरण निर्माण झाले होते तसेच भाविकांनी घडलेल्या घटने बाबत नाराजी व्यक्त करत आरोपिंवर कठोर कारवाई ची मागणी केली आहे.

वाईट गोष्ट