
प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले
मुंबई :आरडीसीए, जोगेश्वरी केमिस्ट अँड ड्रगिष्ट असोसिएशन मुंबई तर्फे एफडीए कमिशनर पिंटो मॅडम यांच्या आव्हाना नंतर जोगेश्वरी च्या सर्व केमिस्ट बांधवांनी पंढरीच्या वारीसाठी वारकऱ्यांसाठी वैष्णव ट्रस्ट मुंबई यांना मोफत औषध देण्यात आले. अशी माहिती आरडीसीए आणि अध्यक्ष जोगेश्वरी केमिस्ट असोसिएशन मुंबई-वसंत राऊत यांनी दिली. तसेच ते म्हणाले की या प्रकारे हजारो वारकऱ्यांना मोफत औषध उपलब्ध होणार असल्याने आजारी पडल्यावर उपयोग होणार आहे.कारण महाराष्ट्राच्या अनेक भागातून सामान्य वारकरी वारी ला जातात त्यात तरुण, वयस्कर पुरुष, महिला ही असतात आणि ते उन्हात, पावसातून वारीला जात असताना त्यांना ताप, सर्दी खोकला व इतर तापाचे आजार होतात अशा वेळी या औषधंचा उपयोग यांना होईल.
Good