“हेरिटेज वाडी” म्हणजे मराठी तरुणाच्या व्यवसाय कौशल्याची कहानी!!

Share

छाया चित्र : मराठी तरुण व्यवसायिक संपत जाधव

प्रतिनिधी :सुरेश बोर्ले.
सातारा : साधारपणे जुलै महिन्याच्या,शेवटच्या
आठवड्यानंतर साताऱ्यातील
“कास पठार”पाहण्याचे वेध संपूर्ण महाराष्ट्र व भारताला लागतात.पावसाच्या रिम झिम सरींनी हा परिसर नानाविध फुलांनी सजायला सुरुवात होते.साधारपणे ऑक्टोंबर पर्यंत हा सुगीचा फुलांचा बहर असतो.परंतु ह्या कास पठारावर जाण्याच्या मार्गावर, आताले टेकडीवर एक टुमदार रमणीय
“हेरिटेज वाडी”नांवाचें उत्तम राहण्याची सोय,न्याहारी, चहापाणी आणि जेवण्याची खास सोय असलेले उपहारगृह दिमाखात ऊभे असलेले नजरेस पडते.ह्या उपहारगृहाचे तथा संपुर्ण जागेचे मालक हे श्री.संपत जाधव हे असल्याचे कळले!
.एका बाजूला टेकडीवर टुमदार घरे , आद्यावत तरण तलाव,सेल्फी पॉइंट्स,तर टेकडीखाली कृष्णामाई वाहताना तिच विहंगम दृश्य डोळ्यांची पारणे फेडतात.ह्या सगळ्या गोष्टी मनात घर करून जातात. जाधवांचे स्नेही श्री.विनोद बोरले ह्या माझ्या कनिष्ट बंधूंनमुळे,येथे भेट देण्याचा योग आला.पण एवढ्या मोठ्या टेकडीवर कोणी व कसा हा डोलारा उभारला ह्याची उत्सुकता लागून राहिली. शेवटी मालकांची भेट झालीच.
श्री.संपत जाधव म्हणजे अतिशय संयमी शांत व विनम्र स्वभावाच व्यक्तींमत्व. सदर उपहारगृह आणि राहण्याची वास्तू कशी उभारली त्या बाबत विचारले असता,ते एकदम स्तब्ध झाले.कदाचित हा डोलारा उभारताना केलेली जिद्द,कष्ट ह्याच दृकश्राव्य चित्रण त्याच्या समोर उभे राहिले असावे. हसरा चेहरा थोडासा भूतकाळात गेलेला मलाही जाणवला.
बालपणी गरिबीमुळे मुंबईत असताना,छोट्या कारखान्यात त्यांनी ओझी वाहण्याचे कामे केली. शिवाय रिक्षाही चालवली. पण त्यांना छायाचित्रणाची विशेष आवड होती.जमेल ती कष्टाची कामे त्यांनी केली.त्यांचे मुंबईत मन रमेना.काहीतरी वेगळ करण्याचा ध्यास! त्यांना सतावत होता,ते गावी आले.छायाचित्रण करता करता आर्थिक अडचणींमुळे , कताळाच्या खडकाळ जागेवर त्यांनी एक छोटेखानी खानपान सेवेचा ठेला काढला.त्यांनी स्वतः राबून ह्या ठेल्यासाठी मेहनत केली. त्यात भांडी घासणे धुणे , ठेला स्वच्छता राखून व ग्राहक सांभाळणे ही कामे मनोभावे केली.दरम्यान रोज दहा किलोमीटर अनवाणी पायी जाऊन शिक्षणही १० वी पर्यंत आपल पूर्ण केलं हे विशेष.कारण वडील शेतकरी,आई गृहिणी आणि भावंडे असा परिवार! गरिबी पाचवीला पुजलेली.संपत हे धाकटे असल्याने,त्यांनी मोठ्या भावांनचेही त्यावेळी कपडे वापरले.कांहीं काळ मुंबईत आल्यावर रिक्षा चालवली,तीही वडिलांनी कशी बशी घेऊन दिलेली.दरम्यान त्यांनी मिटकोन ह्या संस्थेतून,छायाचित्रणाचा कोर्स पूर्ण केला.आर्थिक
हालाकीने ते मुंबईतील गावच्या खोलीत रहायचे व अनेक जोड धंदे करायचे.गावातून मित्राचा निरोप आला,गावी ये काहीतरी व्यवसाय करू.मग पुन्हा गावाकडे वळले.आपल्याभावांना त्यांच्या धंद्यात मदत करत,त्यांनी किंमती कॅमेरा कसाबसा विकत घेतला.कारण छायाचित्रणाचा नाद त्यांना गप्प बसू देत नव्हता.भावाच्या व्यवसायात,एक बाजूला त्यांनी आपला छायाचित्रणाचा व्यवसाय सुरू केला.त्यामुळे मुंबईला त्यांना कॅमेरा मदतनीस म्हणून नोकरी मिळाली.म्हणजे पंढरी वारी प्रमाणे त्यांच्या सातारा मुंबई ह्या वाऱ्या सुरूच होत्या.मग २००४ साली ते विवाहीत झाले. जबाबदारी वाढली.दरम्यान त्यांचे मित्र जे सातारा वर्तमान पत्रात सेवेला होते.त्यांनी आपल्या कचेरीत वर्तमानपत्र छायाचित्रकार म्हणून,नोकरी दिली. मग त्यांनी बायकोचे व इतर सोन्याचे दागिने विकून एक छोटा स्टुडिओ काढला. वर्तमान पत्र छायाचित्रीकरण व स्टुडिओ चालवणे ही दोन्ही कामे त्यांनी केली. शिवाय बंधूंनाही हातभार लावला.तर कुटुंबाची साथ ही त्यांना होतीच.वाडवडीलांच्या पडीक व खडकाळ जमिनीवर, मग त्यांनी आपली सुरुवात व्यावसायिक आर्थिक धोका पत्करून केली.आपले स्नेही मित्रांच्या सहाय्याने त्यांनी बँकेतून १०,००,००० कर्ज घेतले आणि येथेच “हेरिटेज वाडी”ची पायाभरणी झाली. पर्यटकांनसाठीची उत्तम सेवा हेच ब्रीद पुढे घेऊन निघालेले संपतजी व त्यांचा स्नेही स्वभाव,त्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी होऊ लागली.ही जागासुद्धा त्यांना कमी पडू लागली.त्यात त्यांनी २०१४/१५ साली उपहारगृहही सुरू केले तसेच आणखीन जागा स्वतःच्या हिमतीवर विकत घेतली.अनेक सुखसोयी व सुविधांमुळे पर्यटकांची गर्दी अमाप वाढली. ही हेरिटेज वाडीची लोकप्रियता आहे.कास पठार आणि
हेरिटेज वाडी ही समीकरणच आहे.आज ते ह्या व्यवसायात स्थिरावले आहेत.चेहेऱ्यावर यशस्वी व्यवसायाची झलक असली तरी!आपली गरिबी. आपले मित्र,आप्तेष्ट व कुटुंबीय
ह्यांना ते विसरलेले नाहीत.आपले दिवसही ते विसरलेले नाहीत अजूनही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत.ह्याची प्रचिती येते.आजही त्यांचा दिनक्रम पहाटे ५ वाजता सुरू होतो.साताऱ्यातील आपल्या कचेरीत २ ते ३ तास बसून,मग ते आपल्या हेरीटेज वाडील येतात.संपूर्ण व्यवस्था जातीने पाहतात.ह्या व्यवसायात उपरोक्त माणसांनी केलेल्या सर्वांगीण मदतींचे ते ऋणी आहेत.संपजती त्यांना विसरणे अशक्य आहे.त्यावेळी त्यांचा चेहरा एखाद्या फुला सारखा फुलला होता.चेहऱ्यावर समाधानी आनंद ओसंडून वाहत होता.सदरचा लेख हा स्वतःच कर्तृत्व दाखविण्यासाठी, त्यांनी मुळीच दिलेली नाही. मराठी तरुणांनी ह्यातून कांहीतरी बोध घ्यावा व समृद्ध बनावे हेच समाज प्रबोधन.
“हेरिटेज वाडीचे”आहे.


Share

5 thoughts on ““हेरिटेज वाडी” म्हणजे मराठी तरुणाच्या व्यवसाय कौशल्याची कहानी!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *