शाळेत नवनियुक्त कॅप्टन सेरेमनी ..

Share

प्रतिनिधी :राजेश पंड्या

मुंबई : वांद्रे मुंबई येथील सेंट टेरेसा हायस्कूल मध्ये नुकतीच नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आणि सन 2025/26 साठी नवनियुक्त कॅप्टन सेरेमनी अर्थात स्कूल कौन्सिल टीम निवडली गेली. सदर कार्यक्रम मंगळवार दिनांक 8जुलै 2025 रोजी शाळेच्या  सभा गृहात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीन संपन्न झाला.कार्यक्रमवी सुरुवात प्रार्थनेने तसेच दीप प्रज्वलन करून झाली.

शाळेच्या शिक्षिका अॉलविडा यांनी पाहुण्यांची ओळख व स्वागत केले. यावेळी 

नवीन हेड बॉय आणि हाउस कॅप्टन यांनी सन्मानपूर्वक शपथ घेतली आणि शिस्त, नियम आणि जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने सांभाळणार असल्याचे सांगितले.सर्व विद्यार्थ्यांना देखील शिस्त, निष्ठा व सेवा यांची शपथ दिली गेली.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून  पोलीस विकास बाबर  उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात नेतृत्व गुणांचे महत्त्व विशद केले आणि विद्यार्थ्यांना सदैव प्रामाणिक राहण्याचे आवाहन केले. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार काळे आणि वाघ साहेब हे देखील जातीने हजार होते.

शाळेचे मुख्याध्यापक फादर शिनॉय मेथ्यु यांनी नवीन टीमचे अभिनंदन केले. त्यांची कर्तव्ये आणि जबाबदार्‍या याबद्दल त्यांना मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सविना डायस यांनी केले. शाळेचे मॅनेजर फादर हेन्री, उपमुख्याध्यापिका , पर्यवेक्षिका , व इतर   शिक्षक, पालक आणि सर्वांनीच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाची यशस्वी आखणी शाळेतील इयत्ता आठवी कमिटीने केली होती..


Share

One thought on “शाळेत नवनियुक्त कॅप्टन सेरेमनी ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *