
प्रतिनिधी :कृष्णा वाघमारे
कोलकाता : कोलकात्या मधील महाराष्ट्रीय कुटुंबियांना एकत्र येऊन प्रथमच यावर्षीचा वारकरी दिंडी सोहळाउत्साहाने साजरा केला आहे.कॉलनीतील इतर भाषिक लोकांना महाराष्ट्रीय वारी व संतांचा वारसा माहिती व्हावा हाही यामागे उद्देश होता.दिंडी झाल्यानंतर सर्व कुटुंबियांनी बनवलेला आषाढी एकादशीचा फराळ एकत्र करून सर्वांनी एकत्र फराळाचा आनंद घेतला.लहान मुलांनी व मोठ्यांनी सुद्धा संतांचे अभंग व हरिपाठ म्हणून आषाढी एकादशी साजरी केली अशी माहिती सचिन थित्ते यांनी दिली.
छान