
प्रतिनिधी :राजेश पंड्या
मुंबई :पश्चिम रेल्वेच्या दहिसर स्टेशन पश्चिमेकडील फलाट क्र1 मुख्य प्रवेशद्वारा च्या पायऱ्यांजवळील बाह्य परिसरात एका जाहिरात एजंसीनेलावलेल्या फलका मुळे स्थानकाचे नावाची माहिती व ओळख देणारे फलक झाकून गेले. मागील काही वर्षां पासून होरडींग लावण्यासाठीजाहिरात कंपनी ने लोखंडी खांबाची मचान उभारली आहे. त्यावर मोठंडा जाहिरातीचे फलक लावले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून या दहिसर स्टेशनाच्या छतावरील मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिहिलेले स्टेशनचे नावाचे फलक झाकल्या गेले आहे, नाव अवरोधित झाले असून स्टेशनात ये जा करताना प्रवाशांना समोरून छतावरील नाव दिसत नाही, लोकांना स्टेशनाच्या नाव स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे, खांबाचा उभारणी करताना रेल्वे प्रशासन किंवा महानगर पालिकेच्या अधिकार्यांनी बांधकामाची उंची वाढवून व मोठे जाहिरातीचे होरडींग लावून अडथळा निर्माण होईल या बाबतीत दुर्लक्ष केले आहे. स्टेशनचे नाव अवरोधक करणारे बांधकामांना रेल्वे प्रशासन किंवा बीएमसीने होरडींग लावण्याची परवानगी कशी दिली ?
स्टेशनाच्या मुख्य प्रवेशद्वारा च्या पायऱ्या चढताना, ये-जा करताना, प्रवाशांना समोरून स्टेशनचे नाव दिसले पाहिजे या बाबतींत प्रशासनाने जाहिरातीचे अडथळा दूर करुन प्रवाशांना व दहिसर ची जनतेला तातडीने न्याय द्यावे मागणी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ ( प. रे.) चे उपाध्यक्ष राजेश पंडया यांनी पश्चिम रेल्वेचे एडी आरएम अधिकारी सुनील कुमार तिवारी यांच्याकडे केली आहे.
राजेश पंड्या :नवीन व बाहेर गावावरून आलेल्यांना स्थानकाचे नाव दिसत नसल्याने संभ्रम होतो.या बाबत महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघाने पश्चिम रेल्वेचे एडी आरएम अधिकारी सुनील कुमार तिवारी यांच्याकडे केली आहे.
बार jjall
बार jjall