“कर तस भर”हा निसर्गाचा नियम आहे, भाजपा ला विसर पडलं का?

Share

.
प्रतिनिधी : सुरेश बोर्ले

मुंबई: मुख्यमंत्री साहेब मी पुन्हा परत येईन! अशा घोषणा करून आपण परत आलात.ते काय तुमच्या विधानावर का?तुम्हाला जनतेने निवडून दिले म्हणून,हे आपण विसरू नये.ते सोडून आपण व आपला पक्ष जनसेवा करण राहील बाजूलाच! आपण तर ह्याला ईडी त्याला ईडी लाव फोडा फोडी कर! अशा तलवारीच्या टोकावर आपण आपला पक्ष वाढवला. शेवटी रडीचा डाव खडी होतोच! “कर तस भर”हा निसर्गाचा नियम आहे,हे विसरून चालणार नाही.त्यामुळे महाराष्ट्राचा विकास होण्यापेक्षा तो अधोगतीकडे वळतोय!ही एक गंभीर बाब आहे.मोठ्या आशेने खास करून मराठी जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे,तुम्ही असा मोबदला भूमिपुत्रांना देताय! हे आमच दुदैव आहे.महाराष्ट्राला मारक घटना आपल्या अखत्यारीत घडत आहेत?आमच्यावर हिंदी सक्ती करताय,परप्रांतीय मुजोरी करतायत,त्यांची पाठराखण करताय.त्यासाठी परप्रांतीय मोर्चे काढतात.तर भूमिपुत्रांना मोर्चा काढण्यास परवानगी नाही! वा! देवेनद्ररा अजब तुझे सरकार.युतीचे आमदार आमदार निवासतील उपहारगृहात चड्डी टॉवेल घालून मारधाड करतात,पुन्हा कंत्राट त्याच ठेकेदाराला देताय.तर दुसरे पलंगावर वामकुक्षी घेताना, सिगारेटचे झुरके मारतात. त्यांच्या पायथ्याशी बॅगेत नोटांची बंडले दिसतात.याचा अर्थ
“५० खोके एकदम ओके” ही विरोधकांची आरोळी शोभते.हे लोकांचे मत झाले आहे.साथीदार ठाणेवाल्यांच्या माणसांना त्यांच्या करवी समज देण्याचा प्रयत्न करून तंबी देताय!आता तर तुमच्या गोपी चंदनी विधान भवनाचे पावित्र्यच!हाणामारी व गुंड प्रवृत्तीचे लोक आणून नष्ट केलेलं आहे.आता तुम्ही काय व कशी कारवाई कराल? हे जनतेला पहायचे आहे.एकंदरीत आपली व आपल्या पक्षाची प्रतिमा डागाळली आहे.कदाचित याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीत दिसेल.शिवाय एक बडे नेते बोललेच आहेत की ठाकरे बंधूंना एकत्र आणायचे काम,जे स्व.बाळासाहेबांना नाही जमलं,ते फडणवीसांना जमलं.हि कृती येणाऱ्या काळाची आपल्यावर कुरघोडीची ही नांदी आहे.याची जनतेकडून नोंद घ्यावी!!


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *