“राजकीय लढाईत ईडीचा वापर का केला जात आहे?”
दिल्ली : मुडा प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी बीएम पार्वती आणि मंत्री बिरती सुरेश यांच्याविरुद्ध ईडीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. सरन्यायाधीश बीआर गवई एएसजीला म्हणाले.
“कृपया आम्हाला बोलण्यास भाग पाडू नका नाहीतर आम्हाला ईडीवर कडक टिप्पणी करावी लागेल… माझा महाराष्ट्राचा स्वतःचा अनुभव आहे… देशभरातील राजकीय लढाईत ईडीचा वापर करू नका.”
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ठणकवले आहे:”आम्हाला उच्च न्यायालयाच्या निर्णयात कोणतीही त्रुटी दिसत नाही, विशेष परिस्थितीत याचिका फेटाळली जाते.”