प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल मा.राधाकृष्णन साहेब!राज्याच्या मातृभाषेबद्दल टी व्ही वर महाराष्ट्राला उपदेश देताना दिसतात.मराठी भाषेचा प्रांतीय वादाबद्दल कोणाला मारपीट करण चांगलं नाही. अशा भाषा सक्तीने आंतरिक वाद वाढतील!कोणताही उद्योग महाराष्ट्रात येणार नाही.सलोखा जनतेने ठेवावा.वगैरे!अहो राज्यपाल साहेब,हे तुम्ही आधी तुमच्या दाक्षिणात्य लोकांना समजवा शहाणपणा कळल.तेथे हिंदीची काय आयमाय काढतात ते आधी बघा.आम्ही थोडीतरी ह्या भाषेची चाड तरी ठेवतो.तुमचेतर हिंदीला बिलकुल भीक पण घालत नाहीत.आमच्या भाषेबद्दल भूमिपुत्रांना कृपया शिकवू नका?आपली दिलेली सरकारी सेवा आपण करा.हे येथील जनतेच सांगणं आपल्याला आहे. गुजरातमधून २०हजार बिहारी लोकांना हाकलले त्यांना सांगा.कर्नाटक मधून यू पी वाल्यांना हाकलले त्यांना सांगा.आंध्रमध्ये स्थानिक भाषा सक्तीची!त्यांना सांगा. कोणते उद्यागधंदे महाराष्ट्राला देताय?सगळे गुजरातला व अन्य ठिकाणी केंद्राने पळवले.सगळ्या राज्यातील माणसांनी स्थानिक भाषेसहित आपल हित जपायच आणि फक्त महाराष्ट्राने सगळ्या बाबतीत तडजोडी करून, सालोखा ठेवायचा.अरे वा! महाराष्ट्राने सगळ्या गोष्टी सहन करायच्या व इतरांनी येथे येऊन मजा मारायची.जनतेला आपण कमलाबाईंचे “कोशियारी” आहात असा संशय येत आहे.त्यानीं पण येथे उडया मारल्या.शेवटी त्यांना स्वतःहून जावं लागलं! हा महाराष्ट्र आहे.येथे संयम आपण ठेवावा व आपली दिलेली सरकारी सेवा पूर्ण करावी ही मराठी जनतेची आपणास समज आहे.याची आपण नोंद घ्यावी. मातृभाषेचा अभिमान आम्हाला राहणारच. तो कसा ठेवावा,हे कृपया आपण शिकवू नये,हा मराठी जनतेचा कौल आहे.
Right