
प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई : सरकारने नवीन निवृत्ती वेतन वटहुकुम प्रारीत केला.त्याप्रमाणे जुने कर्मचारी जे २००४ पुर्वी निवृत झालेले आहेत,त्यांना ह्या सुधारित वेतनाचा लाभ मिळणार नाही. ८व्या वित्तीय आयोगाप्रमाणे, तो जुन्या वेतन धारकांना लागू होत नाही.मग ही तफावत का?किंवा हा भेदभाव का?ह्या विरोधात त्याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी दिनांक २५ रोजी निवृत्त केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना,वरील संघटना तर्फे मानवी साखळी आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे हजारोंच्या संख्येने केंद्रीय निवृत्त कर्मचारी दादर पूर्व येथील मुख्य डाक तार विभागाच्या कचेरी समोर मानवी साखळी आंदोलनात सामील झाले.हे आंदोलन भल्यामोठ्या प्रमाणात असल्याने,लोकांचे लक्ष वेधून घेत होते.त्यामुळे ह्या नव्या
वट हुकुमात वेतन भेदभावाचा फरकाचा प्रश्न ऐरणीवर आला.त्याविरोधात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी,मुसळधार पावसाची परवा न करता हे निवृत्त ज्येष्ठ नागरिक,जीवाची पर्वा न करता एकसंध झाले.अशा परिस्थितीत महिला निवृत्ती कर्मचाऱ्यांचा सहभाग विशेष होता. आपल्या उर्वरित आयुष्यासाठी ही धडपड होती.येणाऱ्या काळात टप्या टप्प्यात अशी आंदोलने केली जातील,असा इषारा देण्यात आला. मंगेश परब(आ.भा.डा.ता.).,शरद पवार.( राज्य स्तरीय कार्यवाह),डी.के.रहाटे आदींच्या अधिपत्याखाली त्यांच्या मार्गदर्शनानुसार,हे मानवी साखळी आंदोलन शांतपणे यशस्वी पार पडले.वरील सर्व मान्यवरांनी,ह्या आंदोलनात सामील झालेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.आपला बुलंद आवाज हा दिल्लीपर्यंत पोहचावा हाच मुख्य हेतू ह्या आंदोलनाचा होता.सदर आंदोलनात भारतीय डाक तार विभाग,भारतीय संचार निगम, भारतीय रेल्वे,भाभा अणुशक्ती केंद्र व सरकारी निवृत्त कर्मचारी संघटना सामील होत्या.
Fightforrights