
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई :सापांबाबत जनमानसात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा आणि गैरसमज आहेत. सर्पदंश झाल्यावर काय करावे हे देखील माहित नसते, त्यामुळे पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण अधिक असते आणि मृत्यूदर देखील जास्त असतो.
श्रावण महिन्यातील पहिला सण असलेल्या नागपंचमी निमित्त मुंबई कांदिवली मधील डॉ एन डी पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांना किरण जाधव यांनी सापांबाबत समज गैरसमज या विषयावर शास्त्रीय माहिती सांगितली. सापांचे प्रकार, विषारी आणि बिनविषारी सर्प कसे ओळखावे, सर्पदंश झाल्यास काय प्रथमोपचार करावा, सर्प घरात आल्यास काय करावे आणि सर्प घरात न येण्यासाठी काय करावे याविषयांवर माहिती सांगितली.
शालेय मुलांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त सहभाग होता. साप हा देखील पर्यावरणाचा एक घटक असून त्याचे रक्षण करावे हा संदेश नागपंचमी निमित्त देण्यात आला. सर्पाबाबत शास्त्रीय माहिती घेऊन अनोख्या पद्धतीने नागपंचमी सण साजरा केला.
Good work
Very nice
Goodई itiative