
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई : नागपंचमी सणानिमित्त कांदिवली मधील रयत शिक्षण संस्थेचे , ज्ञानवर्धिनी विद्यालय येथील विद्यार्थ्यांना किरण जाधव यांनी डिजिटल पद्धतीने पावर पॉइंट चा वापर करून सापांबाबत समज-गैरसमज या विषयावर अंधश्रद्धा व विज्ञान यांची सांगड, सापांचे प्रकार, विषारी आणि बिनविषारी सर्प कसे ओळखावे, सर्पदंश झाल्यास काय प्रथमोपचार करावा, सर्प घरात आल्यावर काय करावे आणि घरात न येण्यासाठी काय करावे, सापाला डिवचल्यासआपला पाठलाग करतो का? या विषयावर माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी सापांबाबत प्रश्न विचारले प्रश्नांचे योग्य निरसन केले. कर्यक्रमात विद्यार्थ्यांचा उस्फुर्तपणे सहभाग मिळाला. साप हा पर्यावरणाचा घटक असून त्याचे रक्षण करावे हा संदेश नागपंचमी सणानिमित्त देण्यात आला. सर्पाबाबत अंधश्रद्धा व शास्त्रीय माहिती घेऊन अनोख्या पद्धतीने विद्यालयाने नागपंचमी सण साजरा केला.मुख्याध्यापक गावीत डी. सी. व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सहभाग होता.
Best thing to do
खुप छान