प्रतिंनीधी : सुरेश बोर्ले
बॉलीवूड :योडलेचा बादशहा !स्व. किशोर कुमार! ह्या जगात काही लोक आपल्या कामगिरीवर बरीच मेहनत करतात.आपले तन मन धन अर्पून कष्ट घेतात तेव्हा त्यांना यश प्राप्त होत.पण प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांच्या पाचवीला पुजलेली असते.तर काहींच्या नशिबात,उपजत देवाची देणगी त्यांना असते.अशी माणसे आपल ध्येय व उद्दिष्ट सहज गाठतात व आपल्या कार्यात पारंगत होतात.ह्याला म्हणतात “दैवाची देणगी”अशी उदाहरणे आपण अनेक क्षेत्रात पाहतो.अशी दिग्गज मंडळी गान क्षेत्रात, गान कला साधित करीत असताना,ते अनेक नामांकित उस्तादादांकडून,अनेक नामांकित गुरूंकडून आपल्या गायनाची तालीम घेतात.मगच ते प्राविण्य मिळवतात.असे बरेच मासले विश्वात आहेत.पण गुरुविना ज्ञान नाही ह्या विषयाला फाटा फोडून,आपल्या गळ्याला दैवाने दिलेल्या देणगीच्या बळावर,एक मिश्किल आवाजाचा गायक जो हिंदुस्थानी फिल्मी दुनियेत आघाडीचा पार्श्र्वगायक बनला.त्याने चित्रपटसृष्टीत,पार्श्व गायक, स्वगायक,संगीत दिग्दर्शक,फिल्मी दिग्दर्शक आणि फिल्म निर्माता अशी अष्टपैलू कामगिरी केली.ते म्हणजे स्व.किशोर कुमार!अर्थात किशोरदा.त्याचं जन्म ४ऑगस्ट,१९२९ रोजी ब्रिटिशकालीन मध्यप्रदेशातील खंडवा येथे स्व.कुंजुलाल गांगुली ह्यांच्या घरी झाला.त्यांचे वडील पेशाने वकील होते.किशोरदांच मुळ नाव आभास कुमार गांगुली होते.ही चार अपत्ये होती. त्यामध्ये अशोक कुमार, सती देवी,अनुप कुमार आणि मग किशोर कुमार हे शेंडे फळ. अशोक कुमार हे फिल्मी दुनियेत वळले ते नट व गायक कलाकारही होते.त्यांना सहाय्य करण्यासाठी अनुप कुमारही तिकडे गेले.तर किशोर कुमार शिकून पदवीधर झाले.पण त्यांना बालपणीच गायनाची आवड होतीच.कालांतराने ते मुंबईला आल्यावर, स्व.बिमल रॉय ह्याच्या बॉम्बे टॉकीस स्टुडिओत गेले!जेथे अशोक कुमार हे उदयोन्मुख नट म्हणून प्रयत्न करत होते,तेथे अनुप कुमारी जोडील होतेच. किशोरदांना गायनाची आवड असल्याने,ते गायन विभागात कोरस देण्यासाठी उभे राहिले. अशोक कुमार ह्यांनी दादामुनी ही उपाधी लावली तर आभास ह्यांनी किशोर हे नाव आपल्यापुढे लावले,असे ते किशोर कुमार झाले. हळूहळू किशोरजी सिने क्षेत्रात वळले.अभिनय आणि गायन दोन्हीकडे आपलं मोर्चा त्यांनी वळवला.त्यांना पहिली संधी १९४६ साली शिकारी ह्या सिनेमात मिळाली.१९५१ साली आंदोलन चित्रपटात आले.पुढे दोन्ही क्षेत्रात सरसावले.१९५६ नई दिल्ली आणि मग १९५८ साली तिन्ही भावांचा चालती का नाम गाडी अल, ह्या सिनेमाने उच्चांक गाठला.१९६२ हाफ टिकट, १९६४ दूर गगन की छाओमें १९७१ दुर का राही,
१९७४ बढतीका नाम दाढी पण १९६८ आलेल्या पडोसन ह्या चित्रपटाने त्यांना पार्श्वगायनात मोठी उपलब्धता दिली.अनेक चित्रपटात स्वगायक आणि
स्वअभिनेता म्हणुन त्यांनी तो काळ गाजवला.
स्व.किशोरदांनी कधीच कुठल्या उस्तादांकडून,गुरूंकडून गायन कलेचे धडे घेतले नाहीत की तालीम घेतली नाही.आपली नैसर्गिक गायनाची दैवी देणगी व बुद्धिमत्तेच्या सहाय्याने,त्यांनी आपल एक वेगळं जग उभ केलं.पाश्च्यात्य योडलिंग गायकांची छाप त्यांच्या गाण्यावर होतीच. त्याचच अनुकरण त्यांनी आपल्या गायनात केलं.गाण्यात चित्र विचित्र आवाजाने योडलेचा प्रयोग त्यांनीच प्रथम हिंदुस्थानी सिनेमा सृष्टीत आणला ! तो यशस्वीही झाला.गाण्यात वेगळा हेल् काढण,शीटी वाजवण असे विविध प्रयोग त्यांनी केले ते रसिकांना आवडले.त्यांची गाणी लोकप्रिय झाली.त्याकाळच्या दिग्गज गायक स्व.मोहम्मद रफी, मुकेश, मन्नाडे आदींना त्यांनी मोठ्या ताकतीने साथ दिली.तर महिला गायकीत लता दीदी, आशा भोसले ह्या मंगेशकर परिवार सोबत त्यांचे रसायन छान जुळले.तर त्यावेळचे आघाडीच संगीतकार एस. डी. बर्मन, आर. डी. बर्मन, लक्ष्मी प्यारे,कल्याणजी आनंदजी,बप्पी लहरी आदीं बरोबरहि त्यांनी कामे केली.तर सुपर स्टार स्व.राजेश खन्ना साठी ते नशिबवान ठरले.काकांच्या यशामध्ये किशोदांचा सिंहाचा
वाटा आहे. देवानंद,अमिताभ,सुनील दत्त,जितेंद्र,धर्मेंद्र,शशी कपूर, रणधीर कपूर,ऋषी कपूर आदी कलाकारांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केलेलं आहे.त्यांनी हिंदी,मराठी,बंगाली,गुजराथी, आसामी, कन्नड,मल्याळम, ओडिया, भोजपुरी, उर्दूत अशा अनेक भाषेत २,५०० च्या आसपास गाणी गायलेली आहेत.
किशोदानच्या जीवनात अनेक पडाव आले त्यामध्ये त्यांचा पहिला विवाह स्व.रिमा गुहा ठाकूरता ह्याच्याशी १९५०साली झाला.तिचे निधन झाल्यावर १९६० मध्ये देखण्या स्व.मधुबाला बरोबर परिणय झाला.तिचेही निधन झाल्यावर, पुन्हा योगिता बाली ह्यांच्याशी लग्न झाल.नंतर त्यांचा घटस्फोट झाला.शेवटी १९८० साली विधुर असलेल्या लीना चंदावरकर ह्यांच्याशी विवाह झाला.ह्यामध्ये स्व.रिमा गुहा ठाकूरता ह्यांच्याकडून अमित कुमार हे अपत्य झाले.ते मशहूर गायक आहेत.तर लीना चंदावरकर ह्यांच्या पासन सुमित कुमार हे पुत्र झाले.तेही गायनाचे धडे गिरवत आहेत.अश्या ह्या अवलिया गायकाचा सुमधुर आवाज माइकवर अतिशय गोड होता. असा हा आसामी एक दिवस आपल्या घरी पत्नी लीना बरोबर हसत खेळत असताना! कारण मस्करी व हास्य विनोदी हा त्यांच्या स्वभाव होता.ते हृदय रुग्णही होते.ते लीनांशी मस्करी करताच खाली बसले.त्यांना वाटले किशोरदा मस्ती करत आहेत.पण त्याच वेळेला त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला.लीनाजीननी प्रयत्न केले पण उशी झाला होता.किशोरदा आम्हा सर्वांना सोडून स्वर्ग वाटेला निघून गेले. तो दिवस होता!
१३ ऑक्टोबर,१९८७.एक हास्य योडली गायक आणि हास्य अभिनेता! ह्याला हिंदी चित्रपट सृष्टी!कायमची मुकली. येणाऱ्या ४ ऑगस्ट २५ रोजी त्यांच्या जन्मदिना निमित्ताने, त्यांच्या तमाम चाहत्यांतर्फे त्यांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीला सलाम.
मस्त मौला गायक