
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई :बोरवली युनिट हे युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया मुंबईतील नव्याने स्थापन झालेले तरुण अतिशय संवेदनशील व सक्रिय असे युनिट आहे या युनिटने केवळ एकाच वर्षात सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबवले आहेत तसेच गडकिल्ल्यांची शिस्तबद्ध ट्रेक आयोजित केले आहेत. पहिल्याच वर्षात तब्बल 25 यशस्वी कार्यक्रम राबवून YHAI BORIVALI unit ने समाजात सकारात्मक छाप निर्माण केली आहे. पनवेल येथील युसूफ मेहर अली सेंटर येथे निसर्ग मंगळागौर हा कार्यक्रम युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया बोरिवली युनिट ने आयोजित केला. तर निसर्गाचा आपण कुठेतरी देणे लागतो आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी या झाडा फुलांमुळे आणि विविध घटकामुळे मंगळागौर निसर्गात साजरी करून समाजासमोर हा संदेश देण्याचा प्रयत्न केला की सृष्टीचे रक्षण करणे हे आपले सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे बोरिवली युनिटने हा उपक्रम राबवून झाडे लावा आणि झाडे वाचवा आणि हरित धरा म्हणजे सुंदर पृथ्वी साकार करा असा संदेश समाजात पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे या निसर्ग मंगळागौळ कार्यक्रमाला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि जवळजवळ 50 महिलांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला हे सगळं निसर्गाप्रती असलेली आस्था आणि नाळ या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांनी व्यक्त केले. तुकाराम महाराजांनीसांगितले की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्परे आळविते तर हे निसर्गातील झाडे लता वेलीं पासूनआम्ही तजेलदार पणा टवटवीतपणा हिरवेगारपणा घ्यायचा आहे आणि आपला आयुष्य सफल संपूर्ण करायचं असा संदेश समाजाला दिला.
Good