
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई : संबंध देशाला आणि रशिया मध्ये आपल्या पोवड्या मुळे साहित्यामुळे परिचित असलेल्या थोर विचारवंत साहित्यिक समाज उधारक अनुभवाच्या विद्यापीठात पिचडी झालेले अण्णाभाऊ साठे, यांची जयंती मालाड मालवणी गेट क्रमांक ८ आंबोजवाडी येथील सम्राट बुद्धविहार येथे सम्राट बुद्धविहार आर पी आय आठवले गट च्या संयुक्त पणे वतीने थाटात सपन्न झाली, यावेळी आर,पी आय, मालाड तालुका अध्यक्ष सुनील गमरे, पत्रकार सुरेश वाघमारे, ब्लु बर्ड फाउंडेशन चे कैलास आखाडे, आर,पी,आय चे मालाड संघटक नाथा खरात, युवा संस्थेचे विकास वाघमारे, जेष्ठ समाजसेवक सुरेश कांबळे, राजू मानमोठे, उपस्थित होते, यावेळी सर्वांनीआपले अण्णाभाऊ साठे बद्दल मनोगत व्यक्त केले, सदर कार्यक्रमाची सुरवात सुनिल गमरे मालाड तालुका अध्यक्ष आर, पी आय, आठवले, यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली, या कार्यक्रमाचे आयोजन सम्राट बुद्ध विहाराचे संचालक सुनील मगर, व आर पी आय च्या वतीने करण्यात आले होते, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सुनील मगर यांनी तर आभार प्रदर्शन पत्रकार सुरेश वाघमारे यांनी केले यावेळी बहुसंख्य महिला पुरुष युवावर्ग उपस्थित होता
नमन