
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
इचलकरंजी : क्रांती दिन आणि रक्षाबंधनचे औचित्य साधून संविधान परिवार आणि सद्भाव मंच महाराष्ट्रवतीने तिरंगा राखी बांधत स्नेहबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यात आले. परिवर्तनाची गाणी सादर करण्यात आली. राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा संघटक रोहित दळवी यांनी सर्वांचे प्रास्ताविक केले.
अनुभव शिक्षा केंद्राचे अशोक वरुटे प्रास्ताविक करताना म्हणाले,” सौहार्द, शांतता, बहुविधता, एकात्मता धर्मनिरपेक्षता यांचा –
सद्भाव तयार करणारे हे स्नेहबंधन करणे काळाची गरज आहे.
आपला समाज हेही एक विस्तारित कुटुंबच आहे आणि त्या कुटुंबाप्रती स्नेहभाव व्यक्त करण्याची राखी ही एक संधी आहे. आपण सगळी संवेदनशील माणसं आहोत आणि त्यामुळेच जात – धर्म – लिंग – भाषा – प्रदेश – गरीबी-श्रीमंती या कुठल्याही आधारावर भेदभाव असणं आपल्याला मान्य नाही.”
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे बजरंग लोणारी मनोगतात बोलले कि आपल्या संपर्कातील, परिसरातील ओळखीची किंवा अनोळखीही) माणसं, जी आपल्यापेक्षा वेगळ्या सामाजिक स्तरातील म्हणजे जात/ धर्म/ वर्ग/ लिंग/ प्रांत/ भाषा असतील त्यांच्यापर्यंत पोहोचून, त्यांना राखी बांधून त्यांच्याबद्दल स्नेहभाव व्यक्त करण्यासाठी ही राखी रक्षाबंधन जे नव्या संदर्भात स्नेहबंधन ठरेल ते आपण साजरे करुया!
यावेळी राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल होगाडे, युसूफ तासगावे, आरिफ पानारी, बबन बन्ने, मुस्तफा शिकलगार, नम्रता कांबळे , स्नेहल माळी,जयप्रकाश जाधव, अमित कोवे, ओम कोष्टी, रिजवाना कागदी आणि दामोदर कोळी यांचेसह व्यंकटेश महाविद्यालयाचे युवा उपस्थित होते. आभार अमोल पाटील यांनी मानले.
खूपच छान
Unity in diversity keep up good work
Good