रहिवाशांनी काढली भव्य तिरंगा पदयात्रा..

Share

प्रतिनिधी :वैशाली महाडिक

मुंबई : मालाडमधील स्थानिक देशभक्त नागरिकांच्या वतीने आज, रविवार दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी, देशाच्या स्वातंत्र्यसैनिक आणि शूर जवानांच्या राष्ट्रासाठीच्या समर्पण व त्यागाच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. सायं.५ वाजता महाराणा प्रताप क्रीडांगण, मिकाजी समोर, मालाड मेट्रो स्टेशन, लिंक रोड, मालाड पश्चिम येथून सुरुवात होऊन ही भव्य तिरंगा पदयात्रा भुजावले तलावाजवळ संपन्न झाली.

देशभक्तीच्या उन्मेषाने सजलेल्या या भव्य तिरंगा पदयात्रेत मा.भाजप जिल्हाध्यक्ष श्री गणेश खनकर जी, माजी नगरसेविका सौ.जया सतनाम सिंग तिवाना, भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री तेजिंदर सिंग तिवाना यांच्यासह परिसरातील प्रमुख नागरिक व मान्यवरांनी सहभागी होऊन देशाच्या वीर जवानांना अभिवादन केले आणि राष्ट्रभक्ती तसेच देशासाठी समर्पणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला.

या पद यात्रेच्या निमित्ताने भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले की, ही तिरंगा पदयात्रा देशाच्या अखंडतेचा, राष्ट्रीय गौरवाचा आणि जनमानसात देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्याचा एक महत्त्वाचा क्षण आहे. राष्ट्रीय ध्वज तिरंगा, देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आणि सेवेत असलेल्या शूर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा क्षण आहे. हा राष्ट्राचा उत्सव आहे. ज्या प्रकारे पहलगाव येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आणि ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून देशाच्या शत्रूंना प्रत्युत्तर देत देशाने आपले सामर्थ्य दाखवून दिले, त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ही तिरंगा पदयात्रा देशभर काढण्यात येत आहे, ज्याला देशातील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या सशक्त नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंदूरच्या अभूतपूर्व यशानंतर ही तिरंगा पदयात्रा राष्ट्रीय एकात्मता व गौरवाचे सशक्त प्रतीक म्हणून समोर आली आहे. या तिरंगा पदयात्रेत लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि मान्यवर सहभागी झाले.


Share

2 thoughts on “रहिवाशांनी काढली भव्य तिरंगा पदयात्रा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *