
प्रतिनिधी : मिलन शहा
दिल्ली: निवडणूक आयोगाच्या भूमिके विरोधात आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षाच्या पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेतले. यात लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी सह सपा नेता अखिलेश यादव, खासदार प्रियांका गांधी आणि डिंपल यादव यांना बसमध्ये नेण्यात आले.
निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी जात असताना रस्त्यात थांबवण्यात आले व त्यांना ताब्यात घेतले.विरोधकांनी “मत चोरीत सरकारचा सहभाग” असा आरोप केला आहे.
अखिलेश यादव: “आम्ही लोकांची मते वाचवत आहोत, आम्ही मत चोरांना सोडणार नाही, सरकार मते लुटत आहे”.
प्रियांका गांधी: “सरकार भित्रा आहे, ते विरोधकांना घाबरते”.
राहुल गांधी: “ही संविधान वाचवण्याची लढाई आहे, एका व्यक्तीला एका मताचा अधिकार असला पाहिजे”.डिंपल यादव: “भाजप कटात सहभागी आहे”.
Chori nahi ki to darna kaisa?